शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन समितीने सादर केला ४५३.७२ कोटींचा अर्थसंकल्प; बेस्ट प्रमाणे परिवहनचे दर समान करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 19:44 IST

परिवहन प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प समितीने केला ४ कोटी ४१ लाखांनी केला कमी

ठाणे: ठाणे  परिवहन सेवेने सादर केलेल्या ४५८.१३ कोटींच्या अर्थसंकल्पानंतर त्यावर  परिवहन समितीने चर्चा केली होती. त्यानंतर शुक्रवारी समितीने ४५३.७२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. परिवहन प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात ४ कोटी ४१ लाखांनी कमी करत हा अर्थसंकल्प सादर झाला आहे. परंतु यामध्ये परिवहनने पालिकेकडून अनुदानात वाढ केल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे परिवहनचे तिकीट दर बेस्टधर्तीवर समान करण्याची हमी देखील या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. त्यासाठी पत्रव्यहाराही करण्यात येणार असल्याचे परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी स्पष्ट केले.

ठाणे परिवहन सेवेने सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर त्यावर साधक बाधक चर्चा केल्यानंतर परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी शुक्रवारी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये परिवहन सेवेच्या इतर प्राधिकरणाचे किंबहुना बेस्टचे भाडे हे २५ रुपये असतांना तेच भाडे ठाणो परिवहन सेवेचे ८५ रुपये आहे. इतर भाडेही इतर प्राधिकरणापेक्षा अधिक आहे. त्यामुळे एमएमआरडीए प्राधिकरणात प्रवासी सेवा देणा:या विविध महापालिका परिवहन उपक्रमांचे भाडे समान करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात ५० मिडी बसेस घेण्यासाठी २३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु ही रक्कम पालिकेकडून अनुदानास्वरुपात मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ठाणो परिवहन सेवेत इलेक्ट्रीक बसेस दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून बेस्टमध्ये मुंबई आणि पुणे शहरामध्ये या बसेसकीरता ६० टक्के सबसीडी दिली जाते. त्यानुसार ठाणो परिवहन सेवेसही तशीच सबसीडी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेकडून २०१९-२० या वर्षातील १८ कोटीची देणी अद्याप शिल्लक असून यंदाच्या वर्षात ती रक्कम वाढणार असल्याने ती सर्वच रक्कम अनुदान स्वरुपात मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. परिवहन सेवेचे आगार विकास करतांना आनंद नगर, वागळे आगार, कोलशेत आगारांच्या विकासासाठी यापूर्वी २५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु परिवहन समितीने ही रक्कम देखील पालिकेकडून अनुदान स्वरुपात मागितली आहे.

परिवहन सेवेची कार्यक्षमता वाढावी व आर्थिक स्थिती बळकट व्हावी यासाठी अंदाजपत्रकात सुचविल्याप्रमाणो ठाणो महापालिकेकडून २०२०-२१ च्या सुधारीत अंदाजपत्रकात वाढीव १४ कोटी ८४ लाख तसेच २०२१-२२ या मुळ अंदाजपत्रकात महसुली कामाकरीता २०९.७७ कोटी व संचलन तुटीपोटी ९२ कोटी ६४लाख अशी ३०२ कोटी ४१ लाखांच्या अनुदानाची मागणी परिवहनने पालिकेकडे केली आहे.

टॅग्स :BESTबेस्टthaneठाणे