शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

ठामपा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:53 IST

आयुक्तांचा निर्णय । सहायक आयुक्त, उपायुक्तांचा समावेश

ठाणे : ठाणे महापालिकेच्या उपायुक्त तसेच सहायक आयुक्तांच्या शनिवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अंतर्गत बदल्या केल्या. यामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वांच्या टीकेचे धनी झालेले उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडून शिक्षण विभागाचा कार्यभार काढून त्यांची सचिवपदी बदली केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जोशी यांच्यावर चांगलीच टीका होत होती. शिक्षण विभागाची परवानगी न घेता प्रस्ताव महासभेत आणणे, नको त्या प्रस्तावांवर वाढीव खर्च अशा काही प्रस्तावांवरून त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. अखेर, त्यांच्याकडून शिक्षण विभागाचा कार्यभार काढण्यात आला आहे. आता त्यांच्याकडे घनकचरा विभाग, घनकचरा प्रकल्प, जिद्द शाळा, महापालिका सचिव (अतिरिक्त कार्यभार) सोपविला आहे. तर, महापालिका सचिव असलेले अशोक बुरपुल्ले यांच्याकडे अतिरिक्त असलेला सचिवपदाचा कार्यभार काढला असून परिवहनचे व्यवस्थापकपद त्यांना देण्यात आले आहे. तसेच अतिक्रमण नियंत्रण व निष्काषित करणे, स्थावर मालमत्ता आणि सुरक्षा यांची जबाबदारी त्यांच्यावर कायम ठेवली आहे. परिमंडळ-३ वरून त्यांना परिमंडळ-१ वर आणण्यात आले आहे. तर, परिवहन व्यवस्थापकपदी असलेले संदीप माळवी यांच्याकडे पुन्हा माहिती व जनसंपर्क परवाना, क्रीडा व सांस्कृतिक, आपत्तीव्यवस्थापन, जाहिरात, चिंतामणराव देशमुख प्र.प्र. संस्था आणि अभिलेख कक्ष यांच्या जबाबदाºया कायम ठेवल्या आहेत. वर्षा दीक्षित यांच्या खांद्यावर आता परिमंडळ-३ ची जबाबदारी सोपविली आहे.मारुती गायकवाड हे मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्तच्नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहायक आयुक्त मारुती गायकवाड यांची मुंब्रा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी तर शंकर पाटोळे यांची उथळसरवरून नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी बदली केली आहे.च् तर, प्रणाली घोंगे यांची सामान्य प्रशासन विभागातून उथळसर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी, महेश आहेर यांच्या खांद्यावर असलेली मुंब्रा प्रभाग समिती काढून त्यांना आता वागळे प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी आणले आहे. तसेच त्यांच्याकडील स्थावर मालमत्ता व्यवस्थापकपदाचा कार्यभार काढला असून वागळे प्रभाग समितीचे सहायक आयुक्त विजय जाधव यांच्याकडे स्थावर मालमत्ता हे खाते सोपविले आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका