शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

राज्यातील २६ पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये ठाण्यातील सात अधिकाऱ्यांचा समावेश

By जितेंद्र कालेकर | Updated: October 30, 2020 00:32 IST

राज्यातील २६ पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने बुधवारी उशिरा काढले आहेत. यामध्ये ठाण्यातील वाहतूक शाखेचे अमित काळे तसेच भिवंडीचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देउपायुक्त काळेंना मिळाले नवे मीरा भार्इंदर आयुक्तालयठाणे ग्रामीणच्या अपर अधीक्षक पदी स्मिता पाटील

जितेंद्र कालेकर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणो: राज्यातील 26 पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने बुधवारी उशिरा काढले आहेत. यामध्ये  ठाण्यातील वाहतूक शाखेचे अमित काळे तसेच भिवंडीचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांचा समावेश आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षाधीन असलेल्या स्मिता पाटील यांची ठाणो ग्रामीणच्या अपर अधीक्षक पदी बदली झाली आहे.     कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील पोलीस उपायुक्त, अधीक्षक आणि अपर अधीक्षक दर्जाच्या अधिका:यांच्या बदल्या रखडलेल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच राज्यभरातील काही उपायुक्त तसेच अधीक्षक दर्जाच्या अधिका:यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यातील अनेक अधिका:यांना त्यांच्या पसंतीची ठिकाणो मिळत नसल्याने गेली काही दिवस या बदल्यांबाबत राज्य शासनाच्या गृहविभागात तसेच महासंचालक कार्यालयांमध्ये त्याचबरोबर आघाडी सरकारमधील नेत्यांच्या कार्यालयांमध्ये ‘खल-बते’ सुरु होती. अखेर गृहविभागाकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर ठाणो शहर आयुक्तालयातील सात उपायुक्तांच्याही बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात वागळे इस्टेटचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांना आयुक्तालयातच ठाणो शहरमध्ये नियुक्ती मिळाली.  त्यांच्या जागी आता मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक विनय राठोड यांची बदली झाली आहे. ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाचे दीपक देवराज यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर अधीक्षक पदी बदली झाली असून त्यांच्या जागी लक्ष्मीकांत पाटील यांना आणण्यात आले आहे. पूर्वी ठाण्याच्या परिमंडळ -5 वागळे इस्टेट येथून बदलून गेलेले (आता प्रतिक्षाधीन) सुनिल लोखंडे यांची ठाणो शहर आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये बदली झाली आहे. मुख्यालय -2 मधील उपायुक्त प्रशांत मोहिते यांना ठाण्यातच उल्हासनगरमध्ये संधी मिळाली आहे. त्यांच्या जागी औरंगाबाद ग्रामीणचे अपर अधीक्षक गणोश गावडे यांची बदली झाली. ठाणो शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे उपायुक्त काळे यांना जवळच्याच नव्या को:या मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-1 मीरा रोड येथे बदली मिळाली आहे. त्यांच्या जागी अलिकडेच आयपीएस झालेले विशेष शाखेचे बाळासाहेब पाटील यांची तर पीसीआर ठाण्याचे ्रीकृष्णकोकाटे यांची विशेष शाखेत बदली झाली आहे. ठाणो शहरचे सुभाष बुरसे यांची गुप्तवार्ता विभागात, आर्थिक गुन्हे शाखेचे संजय जाधव यांची  गृहरक्षक दलाच्या अपर नियंत्रक म्हणून तर भिवंडीचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या (गुप्तवार्ता) अधीक्षकपदी मुंबईत बदली झाली. त्यामुळे योगेश चव्हाण यांची भिवंडीच्या उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसTransferबदली