शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये दुकानदारांनी बळकावले पदपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:52 IST

अतिक्रमणाकडे कानाडोळा; नो ‘हॉकर्स’च्या फलकांखाली फेरीवाल्यांचेही बस्तान

कल्याण : पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना दुसरीकडे या रस्त्याला लागतच्या महंमदअली चौक ते रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा असलेल्या पदपथांवर व्यापाºयांनी दुकानातील जादा सामान थाटले आहे. त्याचबरोबर रस्त्यावर नो-हॉकर्सच्या फलकाखालीच फेरीवाले, भाजीविक्रेत्यांनी बस्तान मांडल्याने चालायचे कुठून आणि कसे, असा प्रश्न पादचाºयांना पडला आहे.शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. परंतु, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रस्त्याचा अधिक भाग व्यापला जात असल्याने आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कार्यकाळात झालेले रुंदीकरण एक प्रकारे निरुपयोगी ठरले आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना त्यात पदपथावर व्यापाºयांनी अतिक्रमण केल्याचे चित्र शुक्रवारी दुपारी महंमदअली चौक ते रेल्वेस्थानकदरम्यान पाहायला मिळते. एकीकडे जुजबी का होईना फेरीवाल्यांविरोधात केडीएमसीच्या पथकांची कारवाई दिसत असताना येथील पदपथ व्यापाºयांना आंदण दिले आहेत का, असा सवाल एकूणच वास्तव पाहता उपस्थित होत आहे. दरम्यान, फेरीवाल्यांचे पुनर्वसन धोरण कृतीअभावी कागदावरच असून केडीएमसी प्रशासनाची यासंदर्भातील कार्यवाही सध्या थंडावल्याचे बोलले जात आहे.आयुक्तांनी किती अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली ?फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी प्रभागनिहाय ‘विशेष फेरीवाला पथक’ स्थापन करण्यात आले आहे. हे पथक रात्री १० पर्यंत कार्यरत राहील, असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, फेरीवाले व व्यापाºयांचे अतिक्रमण पाहता हा दावा फोल ठरला आहे.अतिक्रमण आढळल्यास अधिकारी आणि पथकातील कर्मचारी कारवाईस पात्र ठरतील, असेही आयुक्त गोविंद बोडके यांनी आदेशात म्हटले आहे. मग, वस्तुस्थिती पाहता व्यापाºयांच्या अतिक्रमणप्रकरणी आतापर्यंत पथकातील किती अधिकारी, कर्मचाºयांवर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला, असा सवाल केला जात आहे.नोव्हेंबरमध्ये दुर्गामाता चौक ते महंमदअली चौक रस्ता, पदपथावरील अतिक्रमणे, दुकानांच्या वाढीव बेकायदा शेड तोडण्यात आल्या होत्या. ही कारवाई बोडके आणि अतिक्रमणविरोधी पथकाचे उपायुक्त सुनील जोशी यांच्या उपस्थितीत झाली होती.परंतु, अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यापाºयांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. त्यामुळेच सद्य:स्थितीला व्यापाºयांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा होत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. यासंदर्भात बोडके यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणkalyanकल्याण