शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गायमुखजवळ कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 12:14 IST

ठाण्यात घोडबंदर रोडवर गायमुखजवळ २५ टन कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

ठळक मुद्दे पाच दिवसातील दुसरी घटनाप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यात घोडबंदर रोडवर गायमुखजवळ २५ टन कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. ट्रेलर उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.सुरत (गुजरात) येथून न्हावा शेवा, नवी मुंबईकडे हा ट्रेलर २५ टन कच्चा लूम मटेरियल घेऊन जात होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारासघोडबंदर मार्गावरील गायमुखजवळ चालक तस्सुवर खान यांचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रेलर रस्त्यावरुन अचानक उलटला. त्यामुळे ट्रेलरच्या टाकीतील आॅईल घोडबंदर ते ठाणे मार्गावरील रस्त्यावर सांडले. हा अपघात गायमुख जकात नाक्याजवळील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ९७ समोर घडला. या अपघातामुळे रस्त्यावर आॅईल सांडल्यामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ही माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षासह कासारवडवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. विशेष म्हणजे ट्रेलर पलटी होऊनही या अपघातातून चालक खान हे सुदैवाने बचावल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.* गेल्याच आठवडयात याच मार्गावरुन जाणारा सुमारे २१ टन फर्निश आॅइल घेऊन जाणारा टँकर गायमुख जकातनाक्याजवळ उलटल्याची घटना १४ आॅक्टोंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यामुळे या मार्गावर मोठया प्रमाणात आॅईल सांडले होते. सुदैवाने, यामध्येही कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू, ठाणे अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्ता सफाई करुन या मार्गावरील वाहतूककोंडी फोडली होती. परंतू, वारंवार याच मार्गावर वाहने पलटी होऊन अपघात होत असल्यामुळे या मार्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी तसेच वाहन चालकांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात