डोंबिवली : शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागावी या उद्देशाने कोविड निर्बंध शिथिल होताच ऑगस्ट महिन्यात शहर वाहतूक नियंत्रण उपविभागाने सुमारे ३ हजार रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षाचालक, मालक यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यात विनालायसन्स रिक्षा चालवणाऱ्या ११९ जणांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून ३१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. स्टँड सोडून भाडे घेतल्या प्रकरणी ८५३ केसेस केल्या असून त्यांच्याकडून २२ हजार ६०० रुपये दंड, गणवेश न घालता रिक्षा चालवल्या प्रकरणी १००१ केसेस केल्या असून त्यांच्याकडून २४ हजार २०० रुपये दंड, चालकाकडे लायसन्स नसताना मालकाने गाडी चालवण्यास देण्याच्या १८ केसेस करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून सहा हजार रुपयांचा दंड, समोरच्या सीटवर प्रवासी बसवल्या प्रकरणी कारवाई, तसेच जास्त प्रवासी नेणारे १६८ चालक असून त्यांच्याकडून १४०० रुपये दंड आकारण्यात आला.
..........
विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३ हजार रिक्षाचालकांवर केसेस केल्या आहेत. यापुढे ही कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
उमेश गिते, प्रभारी वाहतूक पोलीस निरीक्षक, डोंबिवली
--------------