शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाकडून लाच घेणाऱ्या टोइंग कर्मचाऱ्यासह वाहतूक पोलिसाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 20:27 IST

नो पार्किंगमधील रिक्षा उचलून नेल्यानंतर ती सोडविण्यासाठी रिक्षाचालकाकडून ३०० रुपयांची लाच घेणारा वाहतूक शाखेचा पोलीस हवालदार गोकुळ झारखंडे (५२) आणि टोइंग वाहनावरील खासगी कर्मचारी सुमित पवार (२५) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नो पार्किंगमधील रिक्षा उचलून नेल्यानंतर ती सोडविण्यासाठी रिक्षाचालकाकडून ३०० रुपयांची लाच घेणारा वाहतूक शाखेचा पोलीस हवालदार गोकुळ झारखंडे (५२) आणि टोइंग वाहनावरील खासगी कर्मचारी सुमित पवार (२५) यांना ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कोर्टनाका येथे नोपार्किंगमधील एका रिक्षावर ९ फेब्रुवारी रोजी वाहतूक नियंत्रण शाखेच्या ठाणेनगर युनिटचा पोलीस हवालदार झारखंडे याने कारवाई करून ती उचलून नेली होती. त्यानंतर संबंधित रिक्षाचालक ती सोडविण्यासाठी पोलीस ठाणेनगर वाहतूक शाखेच्या पोलीस कवायत मैदान येथील कार्यालयाजवळ गेला. तेव्हा झारखंडे याने दंडाची रक्कम जास्त असून त्यांच्याकडून चारशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तीनशे रुपये देण्याचे ठरले. पैसे आणायला जातो, असे सांगून या रिक्षाचालकाने थेट ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून ही आपबिती कथन करून तक्रार दाखल केली. त्यानंतर पुन्हा तो ठाणेनगर कार्यालय परिसरात आला असता, गोकुळ याने टोइंग वाहनावर काम करणाऱ्या सुमित पवार याला ही ३०० रुपयांची लाच स्वीकारण्यास सांगितले. सुमितला लाचेची रक्कम देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग