शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवरही वाहतूक पोलिसांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 21:11 IST

अपघातात अनेकदा पादचाºयांचा हकनाक बळी जातो. अशा अपघातांमध्ये अनेकदा त्यांचा काहीही दोष नसतो. यामुळेच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी पादचाºयांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम हाती घेतल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देअंध, दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी विशेष पुढाकार रस्ता सुरक्षा मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रस्त्यावर अपघात होऊ नयेत, वाहतूक सुरळीत रहावी, हे पहाण्याबरोबच पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे रस्त्यांवरून चालता यावे, याचीही जबाबदारी पोलिसांकडे आहे. ही बाब अधोरेखित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी पादचाºयांच्या सुरक्षिततेवरही विशेष भर दिला आहे.महानगरांच्या विस्तारीकरणाबरोबरच वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे सध्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळेच वाहतूककोंडी होणे ही नित्याचीच बाब आहे. त्यातच विविध कामांसाठी रस्तेही खणलेले असतात. मेट्रोसारख्या प्रकल्पांची आणि स्मार्ट सिटीची कामेही ठाण्यात जोरदार सुरू असल्याने रस्त्यांची रु ंदीही कमी झाली आहे. उरलेल्या जागेत वाट्टेल तशा उभ्या राहाणाºया रिक्षा, फेरीवाले आणि अरुंद पदपथ अशा विविध कारणांमुळे या रस्त्यांवरून पादचाºयांना निर्धोकपणे चालणे ही मोठी कसरतच होते. त्यामुळे आता पादचाºयांना दिलासा देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले, दिव्यांग तसेच अंध व्यक्ती यांना निर्धोकपणे रस्त्यावरून चालणे शक्य व्हावे, रस्ता ओलांडताना त्यांना अडथळा येऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस उत्स्फुर्तपणे मदत करीत आहेत. रस्ते सुरक्षेसंदर्भात राबविल्या जाणाºया विविध उपक्रमांचा रोख सुरक्षित वाहतुकीवर आणि सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे, याबाबत जनजागृती करण्यावर आहे. मात्र, पादचाºयांच्या सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे, असे ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. रस्त्यांवर पहिला अधिकार हा पादचाºयांचा असून नेमकी याच बाबीकडे दुर्लक्ष केले जाते. अपघातात अनेकदा पादचाºयांचा हकनाक बळी जातो. अशा अपघातांमध्ये अनेकदा त्यांचा काहीही दोष नसतो. यामुळेच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी पादचाºयांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम हाती घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली. केवळ सुरक्षा मोहिमेपुरतेच नव्हे, तर पादचाºयांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलीस सदैव कटिबद्ध राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस