शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातील खड्डयांमुळे कोपरी आणि कल्याणमध्ये वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 00:12 IST

मुंब्य्रातील बाहयवळण मार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या खड्डयांमुळे या मार्गावर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविल्याने ठाण्यातील कोपरी तसेच कल्याण परिसरात वाहतूक कोंडीचे चित्र शुक्रवारी निर्माण झाले होते.

ठळक मुद्दे वाहतूक पोलिसांनी केले नियोजनकोंडी फोडण्यासाठी विशेष पथके

लोकमत न्युज नेटवर्कठाणे: मुंब्य्रातील बाहयवळण मार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या खड्डयांमुळे या मार्गावर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविल्याने ठाण्यातील कोपरी तसेच कल्याण परिसरात वाहतूक कोंडीचे चित्र शुक्रवारी निर्माण झाले होते. मात्र, ही कोंडी फोडण्यासाठी नेमलेली विशेष पथके तसेच तैनात असलेल्या क्रेन्समुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिसांना यश आले.मुंब्रा बायपास मार्गावर पनवेत ते ठाणे आणि ठाणे ते पनवेल या मार्गावर खड्डे पडले आहेत. पनवेल ते ठाणे मार्गावर तर सहा ठिकाणी खड्डे असून एका ठिकाणी पूलाची लोखंडी सळई निखळली आहे. त्यामुळेच नवी मुंबईतून ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. मात्र, हलक्या वाहनांना या मार्गावरुन परवानगी देण्यात आली आहे. या काळात हा मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरु केले आहे. ही मुंब्रा येथील वाहतूक महापे ते रबाले, ऐरोली मार्गे पूर्व द्रूतगती मार्गावर वळविण्यात आली आहे. ठाणे शहरात दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते पहाटे ५ या दरम्यान अवजड वाहनांना परवानगी दिलेली आहे. त्यामुळेच याच काळात ठाण्यातील कोपरी भागात तसेच कल्याण मधील काही भागात शुक्रवारी १२ ते सायंकाळी ६ या कालावधीत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परंतू, वाहतूक पोलिसांनी एखादे वाहन बंद पडल्यास तिथे दोन जादा क्रेन्स तसेच वाहतूक पोलिसांची कुमक तैनात ठेवली होती. त्यामुळे ही कोंडी फोडण्यात यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.असा आहे बदल....*वाहतूकीत बदल झाल्याने उरण जेएनपीटीहून गुजरात,भिवंडीकडे जाण्यासाठी ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहतूकीला शिळफाटा येथे प्रवेश बंदी केलेली आहे.* आता ही मोठी वाहने महापेमार्गे, कापरखैरणे, ऐरोली त्यानंतर आनंदनगर कोपरीपूल येथून ठाणे शहरात येणार आहेत. त्यामुळे याच मार्गावर सध्या वाहतूकीचा भार वाढल्यामुळे ही कोंडी काही प्रमाणात होत आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक वॉड्रन यांना याठिकाणी वाहतूक नियमनासाठी नेमण्यात आले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी