शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावर दोन तासांपासून वाहतूक कोंडी, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 10:26 IST

Mumbai-Nashik Highway: मुंबई नाशिक महामार्गावर आज सकाळी 7.वाजे पासून   वाहतूक कोंडी झाली असून 2 तासा नंतर देखील मुंबई नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटातील वाहतूक कोंडी सुटत नाही

- शाम धुमाळकसारा -  मुंबई नाशिक महामार्गावर आज सकाळी ७ वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली असून,  दोन तासांनंतरदेखील मुंबई नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटातील वाहतूक कोंडी सुटलेली नाही. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची दमछाक होत असून काही बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास व्यत्यय येत आहे.

पहाटेच्या  सुमारास जुन्या कसारा घाटातील झीरो पॉईंट वळणावर एक कंटेनर पलटी झाला होता. सदर कंटेनर पलटी झाल्याने एकेरी वाहतूक सुरु असतानाच एक मालवाहू ट्रक रस्त्यात बंद पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.  प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने.आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जव्हार फाटा येथे पोहचले. त्यांनी महामार्ग पोलिसांच्या मदतीने छोटी वाहने पर्यायी रस्त्याने वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही बेशिस्त वाहन चालकांमुळे ओव्हर टेक च्या घाईत तो रस्ता पण जाम करण्यात आला. 

रविवार असल्याने प्रचंड गर्दी लक्षात घेता शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी कसारा पोलिसांना सूचना करीत वाहतूक कोंडी सोडविण्याचे आदेश दिले. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील गावित यांनी कसारा घाटात पोलिसांची कुमक पाठवून महामार्ग पोलीस घोटी केंद्र,आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य यांच्या सोबत मदत कार्य सुरु केले. तर रस्त्यात बंद पडलेला ट्रक व पलटी झालेला कंटेनर बाजूला घेण्यासाठी क्रेन च्या मदतीने टोल पेट्रोलिंग व पॉकेस प्रयत्न करीत आहेत. दरम्यान सकाळी 7 वाजे पासून वाहनचालक, विकेंड चा आनन्द् घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडी मुळे मनस्ताप सहन करावा लागत असून  मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्ण पणे विस्कळित झाली आहे.  मार्गिकेवर 2 किलोमीटर पर्यंत रांगा गेल्या असून, ट्राफिक सुरळीत करण्यासाठी , कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी,महामार्ग पोलीस,घोटी  ,आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य तब्बल  दोन तास मेहनत घेत आहेत. .

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्गthaneठाणे