शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मागोवा २०२०: ठाण्यातील विकासकामांना कोरोनामुळे लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:06 IST

क्लस्टरच्या योजनेला गती दिली गेली आहे.

-अजित मांडकेठाणे :   मागील दोन वर्षांपासून ठाणे पालिकेने कोट्यवधींची अनेक मोठी विकासकामे हाती घेतली होती. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गतदेखील ४२ विकास प्रकल्प तयार केले. परंतु, मार्चपासून कोरोना महामारीने शिरकाव केल्याने काही महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना कात्री लावली असून काही निधीअभावी थांबवले आहेत. पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने एक हजार १०० कोटींहून अधिक खर्चाची कामेच बंद केली. त्यामुळे यंदाच्या वर्षात पालिकेला एकही नवीन प्रकल्प हाती घेता आला नाही. म्हणून क्लस्टरच्या योजनेला गती दिली गेली आहे.

क्लस्टरचा विकासकोरोनामुळे क्लस्टर योजनेचा प्रकल्प लांबणीवर पडण्याची चिन्हे होती. परंतु, आता या योजनेला गती मिळाली असून पहिल्या सहा, त्यानंतरच्या सहा आराखड्यांचे सर्वेक्षण झाले आहे, तर तिसऱ्या टप्प्यातील नऊ आराखड्यांनाही मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. या विकासकामात आता म्हाडा आणि सिडकोची मदत घेतली आहे.

पूर्वेतील सॅटिसठाणे पूर्वेला सॅटिस प्रकल्प उभारण्याचे प्रयोजन केले. त्यानुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी या कामाचा नारळही फोडला होता. परंतु, तो प्रकल्पही अपूर्ण आहे. 

स्टेशनचे कामही रखडले‘स्मार्ट सिटी’तून पालिकेने नवीन ठाणे स्टेशन विकसित करण्याचे प्रयोजन आखले होते. त्यानुसार कागदावरील घोडे नाचविले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात या कामाला आजही मुहूर्त मिळालेला नाही.

चौपाटींचा विकास रखडला

अवघ्या १८ महिन्यांत कळवा, खारेगाव खाडीकिनारी पारसिक चौपाटीचा विकास केला जात आहे. परंतु, आता हा प्रकल्पही रखडला आहे. यासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद आहे. परंतु प्रकल्प खर्चीक असल्याने, न्यायप्रविष्ट असल्याने या प्रकल्पाचे कामही रखडले आहे. याशिवाय वाघबीळ, कोपरी, नागला बंदर आणि इतर ठिकाणीही चौपाटींचा विकास केला जाणार होता. तसेच ११ कि.मी. खाडीकिनाऱ्याचा विकास केला जाणार होता, परंतु ते कामही कागदावरच आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस