शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रिक्षातून प्रवास करत असलेल्या युवतीसोबत टोईंग वाहनावरील कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:58 IST

ठाणे येथील ब्रह्मांड भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या युवतीला वाहतूक पोलिसांच्या टोईंग वाहनवरील खासगी कर्मचाऱ्यांनी अश्लील हावभाव करत लोखंडी दांड्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली.

ठाणे, दि. २१ -  ठाणे येथील ब्रह्मांड भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या युवतीला वाहतूक पोलिसांच्या टोईंग वाहनवरील खासगी कर्मचाऱ्यांनी अश्लील हावभाव करत लोखंडी दांड्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करीत आहेत. विशेष म्हणजे, टोईंग वाहनवर कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यादेखतच हा प्रकार घडत असतानाही त्यांनी खासगी कर्मचाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नसल्याचा दावा पीडित युवतीच्या पालकांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

ठाणे येथील वसंतविहार भागात पिडीत 21 वर्षीय युवती राहते. ती मानपाडा परिसरात म्युजिक क्लासेसमध्ये शिकवते. सोमवारी सायंकाळी ती रिक्षातून घरी परतत होती. ब्रह्मांड परिसरातील सिग्नलजवळ रिक्षा थांबली असता तिच्या बाजूला असलेल्या वाहतूक पोलिसांच्या टोईंग वाहनातील खासगी कर्मचारी पीडित युवतीकडे पाहून अश्लील हावभाव करीत होती. त्याचा जाब रिक्षाचालकाने विचारताच त्या कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केली आणि त्या पीडित तरुणीलाही त्यांनी लोखंडी दांड्याने मारहाण केली. या घटनेनंतर त्या कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान पीडित युवतीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा