शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'अशोका'वरील निर्बंधामुळे पर्यटनावर फेरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 14:52 IST

जिल्हाधीकारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत, त्यामूळ येथील गावकरी आता चिंतेत पडले आहेत. कारण मनाई आदेशामुळं येथील पर्यटन ठप्प झाले आहे.

विशाल हळदे - ठाणे - पाणीटंचाई, अशी ओळख असूनही मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ख्याती आहे. पावसाळ्यात तालुक्यातील अनेक ठिकाणे निसर्गसौंदर्यांनी नटली असून कसाऱ्याजवळील विहीगावजवळ असणारा अशोका धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. काही वर्षांपूर्वी या धबधब्यावर सिनेअभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्यावर अशोका चित्रपटासाठी एक गाणे चित्रित झाले होते. तिथपासूनच हा धबधबा ‘अशोका धबधबा’ नावाने ओळखला जाऊ लागला. 

मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटाच्या आधी असलेल्या जव्हार फाट्यावरून विहिगावच्या या धबधब्यावर जाता येते. मध्य-रेल्वेच्या कसारा स्थानकावर उतरून जीप, रिक्षा किंवा एस.टी.ने या धबधब्यावर जाता येते. या ठिकाणची देखरेख वनविभागाकडून केली जात असून वनव्यवस्थापन कमिटीमार्फत पर्यटकांची काळजी घेतली जाते व मार्गदर्शनही केले जाते. 

या धबधब्यामुळे परिसरातील आदिवासींना चार महिने रोजगार मिळतो. येथील गावकऱ्यांकडून घरगुती जेवणाची व्यवस्थाही केली जाते. जेवणाची ऑर्डर दिल्यास चुलीवरचे शाकाहारी व मांसाहारी जेवणही उपलब्ध केले जाते. परंतु आता जिल्हाधीकारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत, त्यामूळ येथील गावकरी आता चिंतेत पडले आहेत. कारण मनाई आदेशामुळं येथील पर्यटन ठप्प झाले आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनRainपाऊस