शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

टोल आंदोलनातील कार्यकर्त्यांना लॉटरी? राज ठाकरेंनी मागवला आंदोलनाचा तपशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 00:15 IST

टोलनाक्यावर मनसेने केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे व्हिडीओ, फोटो पाठविण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले.

ठाणे : टोलनाक्यावर मनसेने केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे व्हिडीओ, फोटो पाठविण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले. त्यामुळे या आंदोलनात खळ्ळखट्याक करण्यात आघाडीवर असलेल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीची लॉटरी लागण्याची चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे. टोलसंदर्भातील पक्षाची भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

राज यांनी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. सुरूवातीला त्यांनी तालुका अध्यक्षांकडून दुष्काळग्रस्त भागाची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे पदाधिकाºयांना आदेश दिले. सध्या आपल्याकरिता वातावरण चांगले आहे. वारंवार असे वातावरण निर्माण होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांशी सौजन्याने वागण्याचा आदेश राज यांनी दिला. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चला, जनतेची कामे करा, लोक तुमच्याकडे माझा प्रतिनिधी म्हणून पाहतात, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

पक्षाला गालबोट लावणा-या मनसैनिकांना पक्षातून काढण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेला पदाधिकाºयांनी टाळ््या वाजवून दुजोरा दिला. यावेळी आपला पक्ष शेतक-यांच्या पाठीशी असल्याची भूमिका त्यांनी मांडली.दरम्यान, राज्यस्तरावरील पाच पदाधिका-यांच्या नियुक्त्या त्यांनी केल्या. त्यानुसार शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष नागरगुजे, सहकार क्षेत्राच्या अध्यक्षपदी दिलीप धोत्रे, रोजगार - स्वयंरोजगार अध्यक्षपदी महेंद्र बैसाणे, जनहित विधी कक्ष अध्यक्षपदी किशोर शिंदे, तर रेल्वे कर्मचारी संघटना अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.टोलनाक्यांविरुद्ध पुन्हा एल्गारया मेळाव्यात कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली गेली. त्यावेळी एका कार्यकर्त्याने मनसेची टोलबाबतची भूमिका काय, असा प्रश्न लोक आम्हाला विचारतात. टोलचे आंदोलन थांबले का? या प्रश्नाचेही उत्तर त्यांना द्यावे लागते, याकडे राज यांचे या कार्यकर्त्याने लक्ष वेधले.राज म्हणाले की, आपल्या आंदोलनामुळे ६५ ते ७० टोलनाके बंद झाले. उर्वरित ८५ टोलनाक्यांपैकी काही बंद होऊ शकतात. टोलनाक्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणारे संजय शिरोडकर हे मनसेत आले आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन लवकरच टोलनाक्यांबाबत मनसेची भूमिका जाहीर केली जाईल.तो ट्रेलर होता, आता पिक्चर दाखवणार : लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हीडिओ या माध्यमातून आपण दाखवला तो ट्रेलर होता. विधानसभा निवडणुकीत आपण संपूर्ण पिक्चर दाखवणार असल्याचे राज यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेthaneठाणे