शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टोल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका; मनसेचे टोल दरवाढी विरोधात उपोषणास सुरुवात

By अजित मांडके | Updated: October 5, 2023 16:08 IST

वाढत्या महागाईमध्ये टोल दरवाढीची भर पडणार असून यामुळे जीवनावश्यक वस्तूमध्येही दरवाढ होत सर्वसामान्य नागरिकांचे बजेटही कोलमडणार आहे.

ठाणे : टोल दरवाढीमुळे बससेवा, वाहूक सेवा, जीवनावाश्यक वस्तूच्या दरात वाढ होण्याची शक्यात असल्यामुळे टोल दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मनसेच्या जनआंदोलनातून टोल दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान गुरूवारी आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात ठाण्यातील आनंदनगर प्रवेशद्वारासमोर मनसेने उपोषणाला सुरूवात केली आहे.

ठाण्याच्या वेशीवर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावर १ ऑक्टोंबर पासून लागू केलेल्या दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ३० सप्टेंबरपासून जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे. या जनआंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आनंदनगर येथे साखळी उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यात मनसेने ठाण्यातील विविध चौकात निदर्शने करून लोकांना टोल दरवाढीच्या बाबत जनजागृती केली होती. तर गुरूवारी तिसऱ्या टप्प्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्र घेण्यात आला आहे.

वाढत्या महागाईमध्ये टोल दरवाढीची भर पडणार असून यामुळे जीवनावश्यक वस्तूमध्येही दरवाढ होत सर्वसामान्य नागरिकांचे बजेटही कोलमडणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनआंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कुठे ना कुठे ठाणेकर नागरिकांच्या टोल दरवाढी विषयाच्या व्यथा लक्षात घेईल, अशी अपेक्षा होती. पण निगरगट्ट शासन टोल दरवाढ रद्द करत नसून एक तारखेपासून टोल दरवाढ लागू करण्यात आली असून याचा निषेध करत मनसेच्या वतीने उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.

या उपोषणामध्ये शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर, निलेश चव्हाण, महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंडेय, उपशहर प्रमुख पुष्कर विचारे,सुशांत सूर्यराव,मनोहर चव्हाण,विश्वजित जाधव, करण खरे आदी मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :MNSमनसे