शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या लेखकांना हा काळ कळत नाही; ज्येष्ठ लेखक, पत्रकार निळू दामले यांची मुलाखत रंगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 08:49 IST

कोरम मॉलमध्ये शनिवारी ‘ठाणे साहित्य महोत्सव' सुरु झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आताच्या काळात माझ्यासमोर जे साहित्य येते त्यात आजच्या काळातील साहित्य आणि नाटककारांचे चिंतन मला त्यात दिसत नाही. आजच्या लेखकांना हा काळ कळत नाही, हे कारण असू शकेल. कदाचित हा केवळ लेखकांचा दोष नसेलही. राजकारण, अर्थकारण किंवा समाजाची घडण ज्या कालखंडात घडते त्याचा प्रभाव त्यावर पडतो. त्यामुळेही असे होत असावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार, लेखक निळू दामले यांनी  ‘ठाणे साहित्य महोत्सवा’त मांडले.   

कोरम मॉलमध्ये शनिवारी सकाळी शं. ना. नवरे सांस्कृतिक मंचावर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ज्येष्ठ पत्रकार व लेखक निळू दामले, अभिनेते मंगेश देसाई, ख्यातनाम समीक्षक व लेखक डॉ. अनंत देशमुख, जेव्हीएम स्पेसचे संचालक मंथन मेहता, कोरम मॉलचे प्रमुख विकास लध्धा, ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, ‘लोकमत’चे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी या मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून कविवर्य कुसुमाग्रज ग्रंथ दालनातील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

तरुणांच्या हातात त्यांचा काळ राहिलेला नाही तरुण लेखक आपल्याला लिहिताना दिसतात; पण, मला सध्याच्या तरुणांबद्दल दया वाटते. ज्या काळात तरुण सापडलेले आहेत, तो काळ त्यांच्या हातात राहिलेला नाही. या काळाशी कसे जुळवून घ्यावे, हेच तरुणांना समजत नाही. तरुण भारताचे भवितव्य आहे, असे बाेलण्याची फॅशन असली, तरी मला हे भवितव्य फार कठीण दिसते. याचे कारण ज्या पद्धतीने विविध प्रश्नांना तरुण पिढीला तोंड द्यावे लागते, हे प्रश्न यापूर्वी नव्हते. 

 १९९० नंतरचे जग आणि त्यापूर्वीचे जग यामध्ये जमीन - अस्मानाचा फरक आहे. जुन्या गोष्टी वाचून आणि मंथन करून माणसाला काही उपयाेग होईल, अशीही आजची स्थिती नाही.  तुमचे-आमचे जगणे तुमच्या आमच्या हातात नाही. आपली पोरं आणि आई-बाप आपल्या हातात नाहीत, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा अंदाज अजून कोणाला आलेला नाही.

 सगळे विचारवंत थकले आहेत. अशा परिस्थितीत तरुणांबद्दल मला दया येते. काहीतरी करून त्यांनी यातून बाहेर पडावे, असे वाटते. वाचनासारख्या गोष्टीकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. त्यांच्या डोळ्यासमोर एक कोटी आणि दहा लाखांची पॅकेजेस् असतात. त्यांना एक कोटीचे काय करायचे हेच समजत नाही. फ्रान्समध्ये ५६ टक्के लग्न मोडतात. भारतामधील तरुण पिढीत घटस्फोटाचे प्रमाण २० टक्के आहे. पैसे मिळवायचे आणि भांडायचे. हे पैसे कोणावर खर्च करायचे, काय करायचे, असे खूप प्रश्न आहेत. या जीवनसंघर्षात तरुणांचे वाचनाकडे दुर्लक्ष झाले तर त्यात काही नवल नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Lokmatलोकमत