शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘बंद’ काळात टीएमटीचे १५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 06:21 IST

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु, काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसांत ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसचे नुकसान झाले आहे.

ठाणे - भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु, काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसांत ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसचे नुकसान झाले आहे. त्यातही प्रशासनाने अद्यापही बसचा विमा न काढल्याने हा खर्च टीएमटीलाच उचलावा लागणार आहे. तसेच बुधवारी बंदच्या काळात परिवहन सेवेचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ठाण्यातही सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. यातही सकाळी ठाणे परिवहन सेवेमार्फत २५६ बस रस्त्यावर सोडण्यात आल्या होत्या. सकाळी ९ वाजेपर्यंत ही सेवा सुरळीत सुरू होती. परंतु, काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्याने परिवहनने ११ वाजता बस सोडणे बंद केले. परंतु, या काळात परिवहनच्या ६ बसच्या काचा फोडण्यात आल्या असून यामध्ये दोन बसचे खूप नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. मंगळवारी सायंकाळीदेखील परिवहनच्या पाच बसला टार्गेट करण्यात आले होते. दोन दिवसांत परिवहनच्या ११ बसच्या काचा फोडण्यात आल्या असून यामध्ये जुन्याच बसेसचा समावेश आहे.दरम्यान, या बसचे झालेले नुकसान परिवहनलाच सोसावे लागणार आहे. एका काचेसाठी पाच हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार, हा खर्च लाखांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, परिवहनने अद्यापही बसचा विमा काढलेला नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. मागील कित्येक वेळेला अशा प्रकारे आंदोलने असोत किंवा इतर काही घटना असोत, अशा वेळी परिवहनच्या बस टार्गेट केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतानादेखील बसचा अद्यापही विमा काढण्यात आलेला नाही. दुसरीकडे नव्याने घेण्यात आलेल्या बसचा विमा काढण्याचा प्रस्ताव मंजूर जरी झाला असला, तरी त्याची अंमलबजावणी मात्र अद्यापही झालेली नाही.सेवा कोलमडलीबुधवारच्या बंदच्या काळात परिवहनच्या बस सकाळी ११ पासून बंद केल्या होत्या. सायंकाळी ६ वा.नंतर बसेसची सेवा हळूहळू पूर्वपदावर आली. परंतु, तोपर्यंत परिवहनचे १५ लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदthaneठाणे