शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

टीएमटीत इंजिन आॅइल घोटाळा, परिवहनच्या बैठकीत सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 03:46 IST

एसटी महामंडळाशी तुलना करता टीएमटीसाठी जादा इंधन खरेदी केल्याबाबतचे गंभीर आक्षेप ठाणे परिवहन सेवेच्या २०१५-१६ च्या लेखापरीक्षण अहवालात नोंदविले आहेत.

ठाणे : रस्त्यावर बस धावत नसतानाही ठाणे परिवहन सेवेतील बसला जास्तीचे इंजिन आॅइल लागल्याचा मुद्दा, तसेच उपलब्ध असलेल्या बसवर इंधन व दुरुस्ती खर्चात तब्बल ४० टक्क्यांची वाढ आणि एसटी महामंडळाशी तुलना करता टीएमटीसाठी जादा इंधन खरेदी केल्याबाबतचे गंभीर आक्षेप ठाणे परिवहन सेवेच्या २०१५-१६ च्या लेखापरीक्षण अहवालात नोंदविले आहेत. त्यातही इंजिन आॅइलच्या मुद्यावरून परिवहन समिती सदस्यांनी मंगळवारच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरून यामध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली.टीएमटीच्या ताफ्यात ३५१ बस असल्या तरी आजघडीला केवळ ७७ बस रस्त्यावर धावत आहेत. काही वर्षांत हे प्रमाण १८० ते १९० च्या घरात होते. परंतु, ते आता अगदीच कमी झाले आहे. असे असतांना परिवहनला जास्तीचे डिझेल लागतेच कसे, जास्तीचा ४० टक्के खर्च वाढतोच कसा आणि एसटीपेक्षा जास्तीचे इंजिन आॅईल लागतेच कसे असा सवाल सदस्य राजेश मोरे यांनी केला. लेव्हल तपासून इंजिन आॅईलचे टोपिंग केले जाते. त्यानुसार रजिस्टरची तपासणी केली असता, जास्तीच्या आॅईलचा वापर केल्याचे आढळले आहे. त्यातही काही बसचेच या अनुषंगाने लेखापरिक्षण केले असून उर्वरीत बसची तपासणी केल्यास त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून येईल असा आरोपही यावेळी त्यांनी केला. त्यामुळे जे अधिकारी या आर्थिक नुकसानीस जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असेही या अहवालात नमूद केले आहे. दुसरीकडे २०१५-१६ या आर्थिक वर्षात संचलनासाठी उपलब्ध केलेल्या बसवर इंधन व दुरुस्ती खर्चात ४० टक्के वाढ झाल्याबाबतही आक्षेप नोंदविला आहे. उपलब्ध बससाठी आवश्यकतेपेक्षा तब्बल ४ लाख ८ हजार ४०० लीटर जास्तीचे डिझेल वापरल्याचे निदर्शनास आले. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत परिवहनने डिझेल खरेदीसाठी मोठा खर्च केल्याची बाबही समोर आली. एसटी महामंडळाशी तुलना करता परिवहन सेवेच्या बससाठी जादा प्रमाणात इंधन वापरले जात असल्याबाबतही गंभीर आक्षेप नोंदविला आहे. यात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करून सदस्य प्रकाश पायरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रकरणात जे काही आक्षेप नोंदविलेले आहेत, त्याचे योग्य प्रकारे निराकरण करावे आणि त्याचा अहवाल सादर करावा अशा सूचना प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांनी प्रशासनाला केल्या.>टीएमटीच्या जाहिरात ठेक्यात ३२.३० कोटींचा तोटाठाणे : उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यात टीएमटी कमी पडत असताना जाहिरातीच्या ठेक्यातदेखील तोटाच सहन करावा लागल्याची बाब समोर आली आहे. परिवहन सेवेने ४७० प्रवासी निवारे बीओटी तत्त्वावर बांधून जाहिरात प्रदर्शित करण्याचा ठेका दिला होता. यापोटी अपेक्षित उत्पन्नापेक्षा केवळ १० टक्केच उत्पन्न मिळाल्याचा मुद्दा मंगळवारच्या बैठकीत चांगलाच गाजला. त्यामुळे परिवहनला तब्बल ३२.३० कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे. २०१५-१६ चा लेखापरीक्षण अहवालात ही बाब उघड झाली आहे. ठाणे परिवहन सेवेमार्फत २००९-१० या आर्थिक वर्षात ४७० बस प्रवासी निवारे बिओटी तत्त्वावर बांधून १२ वर्षांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी मे. सोल्यूशन अ‍ॅडर्व्हटायझिंग या संस्थेस ठेका दिला होता. या संस्थेने जाहिरात कराचे उत्पन्न हे रोख स्वरुपात देण्याऐवजी परिवहन सेवेस सेमी लोअर फ्लोअर ९ बसेस दिल्या. त्यानुसार प्रस्ताव तयार करतांना ९ बसमधून प्रती दिन ७ हजार ३०० रुपये या प्रमाणे एका वर्षात २३ लाख ९८ हजार ५०० रुपये या प्रमाणे १५ व्या वर्षात ३५.९७ कोटी इतके उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, या बसमधूनकेवळ २००९ ते २०१५ पर्यंत केवळ ३ कोटी ६६ लाख ८९ हजार ४६२ रुपयांचेच उत्पन्न मिळाले आहे. त्यातही उपलब्ध झालेल्या बस या केवळ सहा वर्षच रस्त्यावर धावल्या आणि त्यानंतर त्या वागळे आगारात धूळखात पडून आहेत. एकूणच यामुळे परिवहनचे तब्बल ३२.३० कोटींचे नुकसान झाले असून ते कोण भरून देणार असा सवाल परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी केला. तर या प्रकरणी सोल्यूशन अ‍ॅडर्व्हटायझिंग कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी पदससिद्ध सदस्य राम रेपाळे यांनी केली. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करून संबधींत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे असे आदेश प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांनी प्रशासनाला दिले.