शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

विसजर्नासाठी येणाऱ्या भाविकांची होणार अॅन्टीजन चाचणी; महापालिका आयुक्त शर्मा यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 17:17 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणोशोत्सव काळात विसजर्नाच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची अँटिजन चाचणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे  : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणोशोत्सव काळात विसजर्नाच्या ठिकाणी येणाऱ्या  भाविकांची अँटिजन चाचणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून या ठिकाणी भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ५० हजार अँन्टीजन किट तयार ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका भवन येथे सार्वजनिक गणोशोत्सवच्या अनुषंगाने करण्यात येणा:या विविध कामांचा महापालिका आयुक्त शर्मा यांनी गुरुवारी आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता अजरुन अहिरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणो महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

विसर्जन घाट

श्री गणोश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने पारिसक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी(चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल(निसर्ग उद्यान), कळवा(ठाणे  बाजू), बाळकूम घाट आण िदिवा घाट असे एकूण ७ विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी छोटया गणोश मुर्तींबरोबर मोठया आकाराच्या गणोश मुर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणोश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, गणोश भक्तांच्या वाहनांसाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अिग्नशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आण िप्रसाधनगृह अशी यंत्नणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.

भाविकांची अँन्टीजन चाचणी

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणा:या भाविकांची अँन्टीजन चाचणी करणो महत्त्वाचे आहे. ठाणो महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून या ठिकाणी भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास ५० हजार अँन्टीजन किट तयार ठेवण्यात येणार आहेत.

कृत्रीम तलावांची निर्मिती

श्री गणोश मुर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर, ऋतू पार्क, खिडकाळी तलाव, दातीवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं.१, रायलादेवी तलाव नं.२, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वुडस् उपवन तलाव, बाळकुम रेवाळे आणि कावेसर (हिरानंदानी) या ठिकाणी कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या कृत्रीम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्री गणेश मुर्ती स्वीकृती केंद्रे

महापालिकेने मासुंदा तलाव, मढवी हाऊस, वर्तकनगरमध्ये देवदया नगर ,शिवाई नगर, चिरंजीवी हॉस्पीटल,महागिरी कोळीवाडा, कोपरी प्रभाग समतिी कार्यालय, किसननगर  बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, टेंभी नाका, काशिनाथ घाणोकर नाट्यगृह, पवार बस स्टॉप, वसंत विहार शाळा, कामगार हॉस्पिटल, लोकमान्य नगर बस स्टॉप यशोधन नगर, रजिन्सी हाईट्स, ट्रॉपिकल लगून समोर आनंदनगर, विजयनगरी अँनेक्सा कासारवडवली, लोढा लक्ङोरिया, जेल तलाव, सह्याद्री शाळा मनीषा नगर, आणि दत्त मंदिर, शिळ प्रभाग कार्यालय आदी ठिकाणी श्री गणोश मुर्ती स्वीकार केंद्रे उभी करण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी  निर्माल्य कलश, ध्वनीक्षेपण यंत्नणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्रांवर प्राप्त  होणा-या सर्व गणोश मुर्तींचे महापालिकेमार्फत विधिवत विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी विशेष वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणो डिजी ठाणो प्रणालीद्वारे देखील विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग योजनाही राबविण्यात येणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका