शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रात्री दोन वाजेर्पयत निवडणुकीचे कर्तव्य बजावण-या शिक्षकांना मतदानानंतर हवीय सुटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 17:34 IST

लोकसभेच्या निवडणुकीसाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या आधीच्या दिवसापासूनच शिक्षक व शिक्षकेत्तर शालेय कर्मचा-यांना निवडणूक कामांची जबाबदार चोखपणे पार पाडावी लागते. मतदानाच्या आदल्या दिवशीच त्यांना दिलेल्या मतदान केंद्राचा ताबा घ्यावा लागतो. दिलेले साहित्या जबाबदारीने सांभाळत  त्याच्या जवळच झोपावे लागते.

ठळक मुद्देलोकसभेच्या निवडणुकीसाठी 29 एप्रिल रोजी मतदान त्यानंतर घरी येण्यास बहुतांशी शिक्षकाना 30 एप्रिलची पहाट उजाडणारसतत दोन दिवस कामाचा ताण घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना 30 एप्रिल रोजी सुटी

ठाणे : मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मतदान झाल्यानंतरही रात्री सुमारे 2 वाजेर्पयत निवडणूक कामात गुंतून राहणा-या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना   दुस-या दिवशी सुटी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी  ठाणोसह पालघर, रायगड आदी कोकणातील जिल्ह्यांमधील शिक्षकांनी केली. त्यास अनुसरून ठाणोसह संबंधीत माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिका-यांना लेखी निवेदनाव्दारे साकडे घातले आहे, असे ठाणे  जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले.     लोकसभेच्या निवडणुकीसाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या आधीच्या दिवसापासूनच शिक्षक व शिक्षकेत्तर शालेय कर्मचा-यांना निवडणूक कामांची जबाबदार चोखपणे पार पाडावी लागते. मतदानाच्या आदल्या दिवशीच त्यांना दिलेल्या मतदान केंद्राचा ताबा घ्यावा लागतो. दिलेले साहित्या जबाबदारीने सांभाळत  त्याच्या जवळच झोपावे लागते. जोखमीची ही जबाबदारी संबंधीत शिक्षक, कर्मचा-यांना दुस-या दिवसाच्या मध्यरात्री म्हणजे दोन वाजेर्पयत साहित्य निवडणूक आयोगाकडे जमा होईर्पयत पार पाडावी लागते. त्यानंतर घरी येण्यास बहुतांशी शिक्षकाना 30 एप्रिलची पहाट उजाडणार आहे.यामुळे  सतत दोन दिवस कामाचा ताण घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना 30 एप्रिल रोजी सुटी देणो क्रमप्राप्त होईल, याची शिक्षणाधिका-यांना निवेदनाव्दारे जाणीव करून दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. या सुटीसाठी शिक्षणाधिका-यां प्रमाणोच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले.    माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींना निवडणुकीच्या सर्वात महत्वाच्या म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील कामासाठी मोठय़ाप्रमाणात घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा हजार 715 मतदान केंद्रांवर सुमारे 47 हजारपेक्षा जास्त कर्मचारी निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे निवडणूक यंत्रणोसाठी लागत आहे. त्यात सर्वाधिक माध्यमिक, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठय़ाप्रमाणात जबाबदारी पार पडत आहे. मतदान केंद्रांवर दोन दिवस तणावाखाली असणा-या व रात्री उशिरार्पयत जाबाबदारी निवडण-या या शिक्षकांनी ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या नेतृत्वाखाली सुटीची मागणी लावून धरली आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे त्यांचे लक्ष लागून आहे

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक