तरुणांचे मतदान ठरणार निर्णायक, चाळिशी पार केलेले ६० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:56 AM2019-04-18T01:56:16+5:302019-04-18T01:56:35+5:30

ठाणे, कल्याण आणि भिवंडी या लोकसभेच्या तिन्ही मतदारसंघांत ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत.

The voting of the youth will be crucial, 60 percent crossed the chalisa | तरुणांचे मतदान ठरणार निर्णायक, चाळिशी पार केलेले ६० टक्के

तरुणांचे मतदान ठरणार निर्णायक, चाळिशी पार केलेले ६० टक्के

Next

सुरेश लोखंडे 

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या लोकसभेच्या तिन्ही मतदारसंघांत ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत. यात ३९.६२ टक्के म्हणजे २४ लाख १४ हजार ३८९ मतदार चाळिशीच्या आतील आहे. त्यांना आकर्षित करण्यासाठी या तिन्ही मतदारसंघांतील उमेदवार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे तर त्यांना प्रचार रॅलीत सहभागी करून घेण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहेत. यामुळे या तरुणांचे मतदान निर्णायक ठरण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
लोकसभेच्या या तिन्ही मतदारसंघांत ४० वर्षांच्या पुढील ६०.३८ टक्के म्हणजे ३६ लाख ७९ हजार ९१९ मतदार आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील २४ लाख १४ हजार ३८९ युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी जो तो प्रयत्न करताना दिसून येत आहे. प्रमुख उमेदवारांच्या प्रचारात युवा मतदारांचा मोठ्या प्रमाणात भर आहे. या युवा मतदारांमध्ये १८ ते १९ वयोगटांतील ४३ हजार ७५८ नवमतदार आहेत. यामध्ये २६ हजार ४५ युवक, तर १७ हजार ७१३ युवतींचा समावेश दिसतो. मतदानाचा हा पहिलाच अनुभव घेण्यासाठी हे नवमतदार उत्सुक आहेत.
याशिवाय, २० ते २९ वर्षे या वयोगटांतील आठ लाख ९९ हजार ३५२ मतदार असून त्यात पाच लाख १८ हजार ४८४ पुरु ष आणि तीन लाख ८० हजार ७४५ महिला मतदार आहे. याशिवाय, तृतीयपंथींचे इतर मतदान म्हणून १२३ जणांचा समावेश आहे.
वय वर्षे ३० ते ३९ दरम्यान असणारे मतदार १४ लाख ७१ हजार २७९ असून त्यात सात लाख ९३ हजार १८१ पुरु ष, सहा लाख ७७ हजार ९७० महिला आणि १२८ इतर मतदार आहेत. या युवा मतदारांसह जिल्ह्यात चोखंदळ मतदार म्हणून चाळिशीच्या पुढील ६०.३८ टक्के म्हणजे ३६ लाख ७९ हजार ९१९ मतदारांना आपलेसे करण्यासाठी निवडणूक रिंगणातील ६६ उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहे.
>कल्याण लोकसभा मतदारसंघ : १९ लाख २८ हजार ५४ मतदार असून त्यात १० लाख ४१ हजार २२३ पुरु ष, तर आठ लाख ८६ हजार ६४७ महिला आणि १८४ इतर मतदार आहेत. या मतदानासाठी या मतदारसंघात २८ उमेदवार प्रचार करून मतदारांना विनंती करत आहे.
>जिल्ह्यात पावणेअठ्ठावीस लाख महिला मतदार
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदारांना मतदानाचा हक्क आहे. यात ३३ लाख २२ हजार ९६५ पुरु ष, तर २७ लाख ७१ हजार तीन महिला आणि ३४० इतर मतदार आहेत. याशिवाय, ४० अनिवासी भारतीय तर ९४९ सैनिक मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील या मतदारसंख्येत लवकरच पुरवणी मतदारांचा नव्याने समावेश होईल.
>ठाणे लोकसभा मतदारसंघ
या मतदारसंघात संपूर्ण शहरी भाग समाविष्ट आहे. ठाण्यासह नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर या महापालिका या लोकसभा मतदारसंघात आहेत. यात २३ लाख सात हजार ७३५ मतदार असून १२ लाख ६० हजार ५६५ पुरु ष, तर १० लाख ४७ हजार १२७ महिला आणि ४३ इतर मतदार आहे.
भिवंडी मतदारसंघ
यात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात १८ लाख ५८ हजार ५१९ मतदार आहेत. यात १० लाख २१ हजार १७७ पुरु ष व आठ लाख ३७ हजार २२९ महिला व ११३ इतर मतदार म्हणजे तृतीयपंथींचा समावेश आहे. या मतदारसंघात १५ उमेदवार प्रचारात गुंतले आहेत.

Web Title: The voting of the youth will be crucial, 60 percent crossed the chalisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.