शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 11:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करून पाप झाकता येणार नाही, असा टोमणाही शिंदेंनी राऊत यांना लगावला.

ठाणे : ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक लिहिणाऱ्यांनी ज्येष्ठ गिर्यारोहक, लेखक शरद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन घ्यावे. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवली असती तर असे पुस्तक काढायची वेळी आली नसती, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करून पाप झाकता येणार नाही, असा टोमणाही शिंदेंनी राऊत यांना लगावला.

शरद कुलकर्णी लिखित, अमलताश बुक्स प्रकाशित ‘ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिंदे म्हणाले की, कुलकर्णी यांचे पुस्तक वाचल्यावर चित्तथरारक अनुभव वाचकांना वाचायला मिळतील. गिर्यारोहण हे केवळ साहस नसून ती जीवनशैली आहे. कुलकर्णी यांच्यासारखे अनेक धाडसी लोक या ठाण्यात राहतात, साहसी वृत्ती ठाणेकरांमध्ये आहे. मी डॉक्टर नसलो तरी छोटी- मोठी ऑपरेशन करतो. 

कुलकर्णी यांच्यातील निर्धार, साहस, लढाऊ वृत्तीचे मार्गदर्शन तरुणांनी घेण्याची गरज आहे. यावेळी मनोज शिंदे, रामकृष्ण नेत्रालयाचे डॉ. नितीन देशपांडे उपस्थित होते. 

प्रसंग घडले, लिहीत गेलो... डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले की, या पुस्तकाचा आशय निखाऱ्यासारखा धगधगता आहे. पुस्तक वाचताना प्रत्यक्ष तेथे गेल्याचा अनुभव मिळतो. अशा प्रकारचे जगातील एकमेव पुस्तक आहे. शरद कुलकर्णी म्हणाले की, माझ्यासोबत जे प्रसंग घडले ते मी लिहीत गेलो आणि त्यातून पुस्तक साकारले. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळेल. यावेळी माजी नगरसेवक मनोज शिंदेही उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊत