शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ संघ व्यवस्थापकावर जेलची हवा खाण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:36 IST

घोडबंदर रोडवर झालेल्या एका रस्ते अपघातप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून कापूरबावडी पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्हा खो-खो संघाचे व्यवस्थापक सुमित चव्हाण यांच्यावर वर्षभराने गुन्हा दाखल झाला आहे

पंकज रोडेकरठाणे : घोडबंदर रोडवर झालेल्या एका रस्ते अपघातप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून कापूरबावडी पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्हा खो-खो संघाचे व्यवस्थापक सुमित चव्हाण यांच्यावर वर्षभराने गुन्हा दाखल झाला आहे. संघ चांगला खो-खो खेळत असल्याने व्यवस्थापक म्हणून ते संघ घेऊन ठाण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धांमुळे आपल्याला प्रसिद्धी मिळेल, हाच त्यांचा हेतू होता. मात्र, त्यांच्या चुकीमुळे त्यांच्यावर आता जेलची हवा खाण्याची वेळ ओढवल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात जानेवारी २०१६ मध्ये राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धा आयोजिल्या होत्या. या स्पर्धेसाठी १४ वर्षांखालील गटातील विविध जिल्ह्यांतून खो-खो संघ ठाण्यात आले होते. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश होता. संघ व्यवस्थापकाची भूमिका बजावल्याने त्यातून थोडीफार प्रसिद्धी मिळेल आणि आपले नाव होईल, असे सुमित यांना वाटले होते. त्यानुसार, ते संघ घेऊन आले. स्पर्धेतील १४ वर्षांखालील खेळाडूंसाठी आयोजकांनी राहण्याच्या व्यवस्थेबरोबर येजा करण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. मात्र, ३१ जानेवारी २०१६ रोजी रात्रीचे जेवण झाल्यानंतर चव्हाण हे संघातील १० खेळाडूंना घेऊन आइस्क्रीम खाण्यासाठी घोडबंदर रोडवरील आर मॉल परिसरात जात होते.यावेळी, त्यांनी डिव्हायडर व त्यावर रेलिंग असूनही प्रतिबंधित दुभाजकावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने कार्तिक हरदास या खेळाडूला धडक दिल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला. आणि त्यातच त्याचा मृत्यूही झाला. याप्रकरणी अनोळखी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :Crimeगुन्हा