शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

तिळगूळ २० टक्क्यांनी महागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 04:20 IST

तिळाच्या भाववाढीचा फटका : सर्वसामान्यांच्या खिशावर भार

डोंबिवली : मकरसंक्रांत आणि तिळगुळाचे लाडू यांचे नाते घट्ट आहे. नाती जपण्यासाठी या दिवशी एकमेकांना तिळगूळ देऊ न गोड गोड बोलण्याची गळ घातली जाते. मात्र, तिळाचा भाव किलोमागे ६० ते ८० रुपयांनी वाढल्याने तिळाचे लाडू २० टक्क्यांनी महागले आहेत. त्यामुळे यंदा गोड बोलण्यासाठी खिशावरील भार सहन करावा लागणार आहे.

किराणा विक्रेते ताराराम चौहान म्हणाले की, तिळाचे लाडू १५ दिवसांपासून बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी तिळाचे लाडू १६० रुपये किलोने मिळत होते. तिळाच्या भाववाढीमुळे हे लाडू २०० रुपये किलोवर पोहचले आहेत. मागच्या वर्षी १२० रुपये किलोने मिळणारा तीळ यंदा १८० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे. गुळाच्या दरात मात्र कोणतीच वाढ झालेली नाही.

तिळाच्या वड्या मागील वर्षी १६० रुपये किलोने विकल्या जात होत्या. त्यातही वाढ होऊन त्याचा दर किलोला २०० रुपये झाला आहे. तसेच तिळाचा हलवाही १०० रुपयांवरून १२० रुपयांवर गेला आहे. डोंबिवलीतील मिठाई विक्रेते श्रीपाद कुलकर्णी म्हणाले की, तीळ आणि गुळाचे भाव वाढल्याने तिळाचे लाडू महागले आहेत. मागील वर्षी ३०० रुपये किलोने मिळणारे लाडू ३२० रुपये किलोने विकले जात आहेत. खसखस हलवा २०० रुपये, तर तिळाचा हलवा १६० रुपये किलो झाला आहे. दरम्यान, गुळपोळी, पुरणपोळी आदी पदार्थ बनवण्यासाठी पुरेसे कामगार मिळत नाहीत. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे कठीण जाते, असे विक्रेते म्हणाले.गुळपोळीही महागलीमकरसंक्रातीला गरमागरम गुळपोळी आवडीने खाल्ली जाते. गेल्या वर्षी २२ रुपयांना मिळणारी गुळपोळी यंदा २५ रुपयांना मिळत आहे. नोकरदार महिला गुळपोळी घरी करण्यापेक्षा तयार खरेदी करण्यास पसंती देतात. त्यामुळे तयार गुळपोळीला अधिक मागणी आहे. हा पदार्थ बनवणाऱ्या महिला कमी असल्याने त्यांना कामाचा जास्त मोबदला द्यावा लागतो. तसेच त्यासाठी लागणाºया साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत, असे विक्रेते सांगतात. 

टॅग्स :thaneठाणे