शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Kalyan: टिकटॉकद्वारे पोलिसांची बदनामी, कल्याणमध्ये तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 02:01 IST

महात्मा फुले चौक पोलिसांनी साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, त्याला जामीन मिळाला आहे.

कल्याण : पोलिसांची बदनामी करणारा व्हिडीओ बनवून तो टिकटॉकवर व्हायरल केल्याप्रकरणी रोहित डांगे (१९, रा. वालधुनी) याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिसांनी साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, त्याला जामीन मिळाला आहे.पोलिसांची बदनामी होईल, अशा प्रकारचे दोन टिकटॉक व्हिडीओ एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना बुधवारी मिळाली. या व्हिडीओमध्ये एक तरुण तोंडाला लावलेला मास्क काढून उभा असल्याचे तसेच, एका हिंदी चित्रपटातील पार्श्वसंगीत सुरू असल्याचे आढळून आले. तर, दुसरा व्हिडिओ रात्रीच्या सुमारास बनविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. व्हिडिओमधील तरुणाने लॉकडाउन आदेशाचा जाणूनबुजून उल्लंघन केल्याचेही दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी व्हिडिओमधील तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा, रोहितने तो बनविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रोहित हा सर्पमित्र असल्याने त्याची पोलिसांसोबत ओळख होती.रोहितला ताब्यात घेत चौकशी केली असता आपल्या एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने हा व्हिडिओ बनविल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांची बदनामी करणाऱ्या रोहितला बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.>पीसीआर व्हॅनचा गैरवापर : सर्पमित्र असल्याने रोहितची पोलिसांसोबत ओळख होती. त्याचा गैरफायदा घेत वालधुनी परिसरात नाकाबंदीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या पीसीआर व्हॅनचा गैरवापर करून मोबाइलमध्ये मित्राच्या मदतीने २२ ते २९ एप्रिलदरम्यान हा व्हिडीओ तयार करत प्रसारित केल्याचे रोहितने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस