शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

शासकीय नोकरभरती घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, मंत्री आव्हाड यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 14:31 IST

मला कळत नाही अभाविप कोणाच्या बाजूने आहे? मला हसू येते पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शने कशाला, असे म्हणत आव्हाड यांनी एबीव्हीपीने त्यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे.

ठळक मुद्देज्या कंपन्या परीक्षा घेतायंत, त्या कंपन्या वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. राज्याच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने त्यांना पास केलं आहे. त्यांचं टेंडर इतक लो असतं की त्याच्यात परीक्षा ते बसू शकत नाहीत

ठाणे - राज्यात शासकीय नोकरभरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, त्या कंपन्या फक्त पेपर फोडण्यासाठीच आलेल्या आहेत, असे म्हणत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्यापरीक्षांचे पेपर रद्द केल्याचं समर्थन केलं आहे. जर पेपर फुटला असता, किंवा पेपर फुटून परीक्षा दिली असती तर मेहनत करणाऱ्या मुलांच्या मेहनतीवर पाणी पडलं असतं. मागील तीन दिवसांपासून मी सांगतोय की मला एक टक्का जरी संशय आला तर मी परीक्षा रद्द करेल. मी डायरेक्ट परीक्षा रद्द केली नाही, मी आधी इशारा दिला होता, असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिले. 

लॅपटॉपमध्ये परीक्षेचा पेपर मिळाल्याने गोपनीयतेचा भंग झाला आणि पेपर फुटला आहे, अशी शंका घेत आम्ही पेपर रद्द केला. मला कळत नाही अभाविप कोणाच्या बाजूने आहे? मला हसू येते पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शने कशाला, असे म्हणत आव्हाड यांनी एबीव्हीपीने त्यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. तसेच, एखाद्या मंत्र्याच्या घरावर तुम्ही आंदोलन करत आहात तर ते होणारच, असे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचं समर्थनही त्यांनी केलं. 

ज्या कंपन्या परीक्षा घेतायंत, त्या कंपन्या वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. राज्याच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने त्यांना पास केलं आहे. त्यांचं टेंडर इतक लो असतं की त्याच्यात परीक्षा ते बसू शकत नाहीत. या सगळ्या कंपन्या उचलून बाहेर फेकून द्यायला पाहिजेत. स्टाफ सिलेक्शन, बँकांच्या परीक्षा ज्या कंपन्या घेतात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोघांसोबत टायप करून परीक्षा घ्याव्यात, असे मतही आव्हाड यांनी व्यक्त केले. दरम्यान, आता म्हाडा याबाबत सगळी परीक्षा नियोजन करणार आहे. त्यासाठी आमची आज बैठक आहे, असेही त्यांनी सांगितले. 

आव्हाडांच्या घरासमोर एबीव्हीपीचे आंदोलन

मविआ सरकारचा आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करुन जाब विचारण्यासाठी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अभाविप कार्यकर्त्यांनी धिक्कार आंदोलन सुरू केले आहे. त्यावेळी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अभाविपचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे, दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा जमवला आहे.  

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडexamपरीक्षाmhadaम्हाडाthaneठाणे