शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

ऑपरेशन ऑल आऊटद्वारे ठाणे पोलिसांनी उगारला ६०० आरोपींवर कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 18:05 IST

२३९ अधिकारी आणि एक हजार १८८ अमलदारांचा समावेश: रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यानचे मिशन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहर पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी पहाटे ५ या सहा तासांच्या कालावधीमध्ये ‘आॅपरेशन आॅल आऊट’ हे मिशन राबविले. यात २३९ पोलिस अधिकारी आणि एक हजार १८८ अंमलदारांनी सहभाग घेतला. यामध्ये ६०० पेक्षा अधिक जणांवर कारवाई केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाºयाने दिली. 

    पोलिस आयुक्त जयजित सिंग आणि सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या आदेशाने ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये राबविलेल्या ‘आॅपरेशन आॅल आऊट’ या मोहीमेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाची विविध पथके सहभागी झाली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले,  पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील, पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे तसेच ठाण्याचे उपायुक्त गणेश गावडे, भिवंडीचे उपायुक्त नवनाथ ढवळे, कल्याणचे एस. बी. गुंजाळ, उल्हासनगरचे उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे, वागळे इस्टेटचे अमरसिंह जाधव आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड आदींच्या मार्गदर्शनाखाली आॅल आऊट मोहीम राबविण्यात आली. यात शस्त्र बाळगणाºया नऊ, जुगार खेळणाºया दहा, अंमली पदार्थ बाळगणाºया दोन, भरघाव वेगाने वाहने चालविणाºया ३४ जणांवर कारवाई झाली.

अंमली पदार्थांचे सेवन करणाºया ७१ आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करणाºया २२२ जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. गंभीर गुन्हयांमध्ये पसार झालेल्या आठ आरोपींना अटक करण्यात आली. तर आयुक्तालयाच्या परिसरातील २३३ लॉजेसमध्येही तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान महत्वाच्या ४४ ठिकाणी नाकाबंदी केली होती. सहा तासांच्या या कारवाई दरम्यान गुन्हेगार आणि बेकायदा धंदे करणाºयांमध्ये  मात्र चांगलेच धास्तीचे वातावरण निर्माण झाले  होते. १९० चालकांनाही दणका-वाहतूकीचे नियम मोडणाºया १९० वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख ४८ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

टॅग्स :Policeपोलिस