शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे भाव जाणार साठीच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 00:22 IST

कांद्याचा भाव वाढण्यास सुरुवात झाली असून काही दिवसांनी कांद्याचे दर ६० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता असल्याचे कांद्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठाणे : कांद्याचा भाव वाढण्यास सुरुवात झाली असून काही दिवसांनी कांद्याचे दर ६० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता असल्याचे कांद्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले. ठाण्यात सध्या कांदा किरकोळ दराने ४० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. दरवाढीच्या भीतीने लोकांनी आतापासूनच कांदा साठवण्यास सुरुवात केली आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम नवीन येणाºया कांद्याच्या उत्पादनावर होणार आहे. यावर्षी जुना कांदा भरपूर आहे, परंतु पावसाच्या अभावामुळे नवीन कांदा कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी माल कमी आणि पाऊस जास्त झाल्याने कांदा सडून त्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षीही कांद्याने सर्वसामान्यांना रडवले होते. कांद्याचे दर सत्तरीवर गेले होते, अशी माहिती कांद्याचे व्यापारी संदीप चौधरी यांनी लोकमतला दिली. कांदा महाग होण्याआधी किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये प्रतिकिलो, तर होलसेल बाजारात कांदा १३ ते १४ रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ४० रुपये प्रतिकिलो, तर होलसेल बाजारात कांदा २८ ते ३० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. काही दिवसांत कांद्याचे दर पुन्हा वाढणार असून जानेवारीपर्यंत ६० रुपये प्रतिकिलो असे दर राहतील. तसेच, दुसºया राज्यात कांद्याचे उत्पादन झाले, तर महाराष्ट्रात नवीन कांदा येईल आणि जानेवारीनंतर दर कमी होतील, असे चौधरी यांनी सांगितले. कांद्याचे दर वाढतील आणि नवीन कांदा ओला असल्याने त्याला चव नसते, म्हणून एक ते दोन किलो कांदा घेणारे ग्राहक सात ते आठ किलो कांदा घेत आहेत, असे निरीक्षण ठाण्यातील बाजारपेठांतील विक्रेत्यांनी नोंदवले.>ज्या भागांत कांदा पिकतो, तिथे कांद्यांची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे पुढे उत्पादन कमी होणार असल्याने अर्थात कांद्याचे दर चालू भावापेक्षा २० रुपयांनी वाढतील.- संदीप चौधरी, कांद्याचे व्यापारी

टॅग्स :onionकांदा