शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

तीन तरुण कवींनी सादर केले त्यांचे वाचनानुभव, कविता आत मुरावी लागते -  गीतेश शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:18 IST

दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होणारा इंद्रधनुचा शब्दयात्रा हा कार्यक्रम म्हणजे अशा वाचनवेड्यांसाठी एक पर्वणीच असते. यावेळी तीन तरुण कवींनी त्यांचे वाचनानुभव सादर केले.

ठळक मुद्देतीन तरुण कवींनी सादर केले त्यांचे वाचनानुभवकविता आत मुरावी लागते -  गीतेश शिंदेआजचे कवी काय वाचतात उपक्रम

ठाणे : 'कविता आकृती बंधाने लहान असते त्यामुळे वाचून पटकन होते पण तिचे आकलन व्हायला मात्र वेळ लागतो, त्यासाठी ती आत मुरावी लागते' असे प्रतिपादन केले तरुण कवी गीतेश शिंदे यांनी केले. निमित्त होते इंद्रधनु आयोजित शब्दयात्रा अंतर्गत आजचे कवी काय वाचतात या उपक्रमाचे.

वाचनातून आपल्याला मिळालेला आनंद, संवेदना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याविषयी व्यक्त होण्यासाठी भाषा, विषयाचे कोणतेही बंधन नसलेल्या शब्दयात्रेचा प्रयोग ठाण्यात शिवसमर्थ विद्यालयात येथे आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने आजच्या पिढीतील कवी गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे, प्रथमेश पाठक यांनी आपल्या भाषणातून त्याच्या वाचन प्रेरणांचा आढावा घेतला. संकेत म्हात्रे यांनी अर्नेस्तो कार्देनाल यांच्या कॉस्मिक कँटिकल या संग्रहावर भाष्य करताना हार्ट क्रेन, चार्ल्स बॉदलेअर या जागतिक कवींचे अनुवादक गणेश कनाटे, भारती बिर्जे डिग्गीकर यांनी केलेले अनुवाद सादर केले. कोणतेही पुस्तक वाचायची एक वेळ यावी लागते. आपण पुस्तकं निवडत नसून पुस्तकं आपली निवड करतात असे यावेळी संकेतने म्हटले. तर गीतेश शिंदे यांनी बालकवींपासून ते थेट अशोक कोतवाल, योगिनी सातारकर-पांडे या जवळपास शंभर वर्षांच्या कालखंडातील मराठी कवींचा आढावा घेत सदानंद रेगे, वसंत आबाजी डहाके, नारायण सुर्वे, द.भा. धामणस्कर, प्रशांत असनारे यांच्या कवितांचे रसग्रहण केले. त्यांनी सादर केलेल्या ठोंबरे, ८ मार्चनंतरची बाई या कवितांना रसिकांची विशेष दाद मिळाली. साठोत्तरी, नव्वदोत्तरी कवितेतील सामाजिक बदल याबद्दल बोलत असतानाच जी.ए., प्रकाश नारायण संत, भालचंद्र नेमाडे, गौरी देशपांडे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर यांच्या कथा कादंब-यांचेही अभ्यासपूर्ण दाखले गीतेशने दिले. ‘पिपात मेले ओल्या उंदिर’ आणि ‘रात्र दिव्यांनी पंक्चरलेली’ या मर्ढेकरांच्या गाजलेल्या कवितांचे मतितार्थ प्रथमेश पाठक यांनी सांगत अनंत सामंत यांच्या बेलिंदा, ओश्तोरीज, एम.टी.आयवा मारू ह्या आवडत्या पुस्तकांवर भाष्य केले. तसेच ब्लॉग्स, ई बुक्स, अॉडियो बुक्स, किंडल या माध्यमातूनही बरीच पुस्तकं वाचत असल्याचे सांगत या नव्या माध्यमांकडेही लक्ष वेधले. तर गीतेशने दिवाळी अंकांची साहित्य फराळाची परंपरा विशद करत धुळ्यातून गेली ३३ वर्षे प्रसिद्ध होणा-या कविता रती सारख्या कवितेला समर्पित वाड.मयीन अंकाच्या साहित्य चळवळीविषयी सांगून अशी नियतकालिके टिकवण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. वाचनाच्या आनंदात मनसोक्त विहार करणा-या वाचन वेड्यांसाठी शब्दयात्रेचे व्यासपीठ खुले असल्याची भावना यावेळी इंद्रधनुतर्फे व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई