शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 07:35 IST

ठाणे न्यायालयाचा निकाल । आदिवासी महिलेशी केले होते गैरवर्तन

ठाणे : विधवा आदिवासी महिलेच्या घरात रात्रीच्या वेळेस घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या प्रकाश सीताराम अंधेरे (४२) याला ठाणे जिल्हा सत्र व विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी.पी. शिरसाठ यांनी दोषी ठरवत, शुक्रवारी अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २००८ साली गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रेखा हिरावळे यांनी काम पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये बदल झाल्यानंतर ठाण्यात कठोर शिक्षा होण्याची बहुधा ही पहिलीच घटना आहे.

भिवंडी तालुक्यातील दुगाड, हिवाडी येथे राहणारा आरोपी अंधेरे याने पीडित महिला आदिवासी समाजाची आहे, हे माहिती असतानासुद्धा दि. १९ आॅक्टोबर २००८ च्या मध्यरात्री तिच्या घरात शिरकाव करून, तिचा विनयभंग केला. त्यावेळी ती मुलांसोबत झोपली होती. तिने केलेल्या आरडाओरडीनंतर त्याने तेथून पळ काढला. महिला आणि तिच्या मुलाने अंधेरेला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळाला. गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शिरसाठ यांच्यासमोर चालवला गेला.सरकारी वकिलांचे साक्षी-पुरावे ग्राह्यच्सरकारी वकील हिरावळे यांनी सादर केलेल्या पाच साक्षीदारांची साक्ष तसेच पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने अंधेरे याला दोषी ठरवले व शुक्रवारी शिक्षा ठोठावली. यामध्ये अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार तीन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड, विनयभंगप्रकरणी एक वर्ष कारावास आणि भादंवि कलम ४५२ प्रकरणी सहा महिने कारावास आणि एक हजार रुपये दंड अशा वेगवेगळ्या शिक्षांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास गणेशपुरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी एच.ए. आव्हाड यांनी केला.

टॅग्स :Courtन्यायालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा