शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई न करण्यासाठी लाच स्वीकारणा-या ठामपाच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:52 IST

प्लास्टिक बाळगणा-या बेकरी चालकावर कारवाई न करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणारे ठाणे महापालिकेचे स्वच्छता पर्यवेक्षक संजय मगर, भारत सोनवणे आणि शाहीर खेंगले या तिघांना तसेच नविन वीज मीटर बसविण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणा-या सहायक वीज अभियंत्यालाही ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ डिसेंबर रोजी अटक केली आहे.

ठळक मुद्देवीज वितरण विभागाच्या सहायक अभियंत्यालाही आठ हजारांची लाच स्वीकारतांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : प्लास्टिक बाळगणा-या बेकरी चालकावर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची मागणी करून तीन हजारांची लाच स्वीकारणारेठाणे महापालिकेचे स्वच्छता पर्यवेक्षक संजय मगर, भारत सोनवणे आणि शाहीर खेंगले या तिघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य एका कारवाईमध्ये वीज वितरण विभागाच्या सहायक अभियंत्यालाही आठ हजारांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली आहे.ठाणे रेल्वेस्थानक रोडवरील गौतम शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या एका बेकरीचालकाला ठाणे महापालिकेच्या या तीन कर्मचाºयांनी प्लास्टिकवर कारवाई न करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी पाच हजारांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी या बेकरीचालकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ डिसेंबर रोजी दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी तीन हजारांची लाच स्वीकारताना मगर, सोनवणे आणि खेंगले या तिघांनाही रंगेहाथ अटक करण्यात आली.-------महावितरणच्या अभियंत्यास अटकदुसºया कारवाईत, कोपरी येथील एका गाळ्यामध्ये नवीन विद्युतमीटर बसवून देण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणाºया वीज वितरण कंपनीचा सहायक अभियंता सचिन शेडगे याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. कोपरीतील आनंदनगर चेकनाका येथील एका दुकानात नवीन वीजमीटरची जोडणी करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कोपरी उपविभागाचे सहायक अभियंता शेडगे यांच्याकडे या गाळ्याचा मालक पाठपुरावा करीत होता. अखेर, त्याने २० हजारांमध्ये नवीन जोडणी करून देण्याचे मान्य केले. त्यापोटी १२ हजारांची रक्कम त्याने आधीच स्वीकारली. त्यानंतर, उर्वरित आठ हजारांची रक्कम दिल्यानंतर मीटर बसवून देण्याचे त्याने मान्य केले. दरम्यान, या गाळामालकाने ११ डिसेंबर रोजी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर, उर्वरित आठ हजारांची रक्कम १८ डिसेंबर रोजी देण्याचे ठरल्यानंतर सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग