वसंत विहार येथे आगीत सहापैकी तीन वाहने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:47 IST2021-09-14T04:47:08+5:302021-09-14T04:47:08+5:30

ठाणे : वसंत विहार येथे सिद्धांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना लागलेल्या आगीत सहा वाहनांनी ...

Three of the six vehicles were destroyed in the fire at Vasant Vihar | वसंत विहार येथे आगीत सहापैकी तीन वाहने खाक

वसंत विहार येथे आगीत सहापैकी तीन वाहने खाक

ठाणे : वसंत विहार येथे सिद्धांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना लागलेल्या आगीत सहा वाहनांनी पेट घेतल्याची घटना सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन वाहने जळून खाक झाली असून, यामध्ये एक चारचाकी वाहनासह दोन दुचाकींचा समावेश आहे.

या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट गेल्याने त्या आगीची झळ लागून आजूबाजूच्या इतर पाच वाहनांनीही पेट घेतला. वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत तीन वाहने पूर्णपणे जळून खाक झाली. अन्य तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले. ही आग दोन चारचाकी आणि चार दुचाकी वाहनांना लागली होती. ती नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. तसेच या घटनेत कोणीतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Web Title: Three of the six vehicles were destroyed in the fire at Vasant Vihar