शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये तीन पोलिसांना डांबून ठेवत मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 10:40 IST

तीन पोलिसांची सुटका करून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले

धीरज परब 

मीरारोड - मीरारोड पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांना नशेत बेधुंद असणाऱ्या 14 जणांनी डांबून ठेवत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका इमारतीत पहाटेपर्यंत चाललेल्या मद्यधुंद पार्टीची तक्रार आल्याने तेथे गेलेल्या पोलिसांसोबत हा प्रकार घडला. पोलिसांचा मोठा ताफा आल्यानंतर या तीन पोलिसांची सुटका करून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. 

मीरारोडच्या पूनम गार्डन भागात समृद्धी नावाच्या इमारतीतल्या डी 603 क्रमांकाच्या सदनिकेत मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू असल्याची तक्रार पहाटे 5 च्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात आली. तक्रार मिळताच मीरारोड पोलीस ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी सदर सदनिकेवर गेले. आतमध्ये हुक्क्याचा धुराडा आणि मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा सुरू होता. पोलिसांनी तक्रार आली असल्याने गोंधळ बंद करा असे सांगितले. त्यावर नशेत असणाऱ्या 14 जणांनी पोलिसांनाच डांबून ठेवत धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच एका पोलिसाचा मोबाईलही काढून घेतला. 

एका पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ निरीक्षक वसंत लब्दे यांच्याशी संपर्क साधून आपल्याला डांबून मारहाण केल्याचे कळवले. लब्दे यांनी त्वरित नया नगर आदी जवळच्या पोलिसांना पण घटनेची माहिती देत पोलीस बळ मागवले. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाल्यावर तीन पोलिसांची सुटका करण्यात आली. 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

उज्वल कैलासचंद्र त्रिवेदी (26), चिराग कैलासचंद्र त्रिवेदी (31), श्रीयांश मनीष शहा (21), कृष्णा दीपक अग्रवाल (21), तन्मय नितीन राणे (25), रिकी सुरेश कोटी (29), दीपेश दिनेश गोहिल (26), वृषभ शैलेश बरवालिया (29), निखिल केरीर मस्कारिया (35), राजवीर केजरीन पीटर मिनिजोस (26), राहुल रमेश परुळेकर (26), अजय शैलेंद्रप्रताप सिंग (26), शिप्रा चिराग सिंग (28), रेखा राजेश पिंपळकर (38) अशी ताब्यात घेतलेल्या लोकांची नावं असून हे सर्व मीरारोडचे रहिवासी आहेत.पार्टी सुरू असताना हुक्का आणि मद्यसेवन चालले होते. त्यामुळेच ताब्यात घेतलेल्या सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. 14 जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे लब्दे यांनी सांगितले. 

टॅग्स :mira roadमीरा रोडPoliceपोलिस