शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इकबाल कासकरसह तीन जणांना खंडणीच्या गुह्यात न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 15:15 IST

कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्यासह 3 जणांना खंडणीच्या गुह्यात ठाणे (सुट्टीच्या) न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

ठाणे - कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्यासह 3 जणांना खंडणीच्या गुह्यात ठाणे (सुट्टीच्या) न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. इक्बाल कासकर आणि दाऊद टोळीची सूत्रे हलवणा-या छोटा शकीलसह सात आरोपींवर पोलिसांनी बुधवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हे दाखल केले. 

वरिष्ठ अधिका-यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून या आरोपींवर ‘मकोका’ लावण्यात येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वांत आधी प्रसिद्ध केले होते.ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाने गेल्या महिन्यात इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना अटक केली.

जागेच्या वादातून व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा एक गुन्हा त्यांच्यावर कासारवडवली येथे, तर दोन गुन्हे ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. एक महिन्याच्या तपासामध्ये पोलिसांनी जमा केलेले पुरावे आणि आरोपींच्या जबाबातून संघटित गुन्हेगारीवर शिक्कामोर्तब झाले.

संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी १९९९ साली ‘मकोका’ अस्तित्वात आला. या कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला सहा महिने अटकपूर्व जामीन मिळत नाही. न्यायालय आरोपीला एक महिन्याची पोलीस कोठडी देऊ शकते. इतर गुन्ह्यांमध्ये तीन महिन्यांच्या आत पोलिसांना आरोपपत्र दाखल करावे लागते. ‘मकोका’च्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना सहा महिन्यांचा अवधी मिळतो.

एकूण सात आरोपींवर नोंदवला गुन्हा-‘मकोका’च्या प्रस्तावास वरिष्ठांची मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी कासारवडवली येथील खंडणीच्या गुन्ह्यामध्ये छोटा शकील, इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद, पंकज गंगर तसेच शम्मी आणि गुड्डू या बिहारच्या दोन शूटर्सवर ‘मकोका’अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इक्बाल कासकर, मुमताज इजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि पंकज गंगर हे सध्या पोलीस कोठडीत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Iqbal Kaskarइक्बाल कासकर