शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पाटाेळेसह तिघांची रवानगी ठाणे कारागृहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:22 IST

मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याच्या माेबदल्यात ७० लाखांची मागणी करून पाटोळे यांनी ३५ लाख रुपये त्यांच्या सहकार्याच्या  माध्यमातून १ ऑक्टाेबर राेजी स्वीकारले हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटाेळे यांच्यासह तिघांना ठाणे न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची  न्यायालयीन काेठडी सुनावली. वैद्यकीय तपासणीनंतर पाटोळे यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात  रवानगी करण्यात आल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याच्या माेबदल्यात ७० लाखांची मागणी करून पाटोळे यांनी ३५ लाख रुपये त्यांच्या सहकार्याच्या  माध्यमातून १ ऑक्टाेबर राेजी स्वीकारले हाेते. यातील नाेटीस देण्यासाठीच्या २० लाखांपैकी १० लाख रुपये सुशांत सुर्वे याच्या बॅंक खात्यामार्फत स्वीकारले. प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी ५० लाखांपैकी २५ लाख रुपये ओमकार गायकर याच्यामार्फत स्वीकारले.  याच प्रकरणात पाटाेळेसह दाेघांना मुंबई तर सुर्वे याला ठाणे एसीबीने  अटक केली हाेती. पाटाेळे यांना दाेन वेळा एसीबीची काेठडी मिळाल्यानंतर  साेमवारी त्यांच्या काेठडीची मुदत संपली. सरकारी वकील संजय लाेंढे यांनी आराेपीला आणखी एसीबीची काेठडी देण्याची मागणी केली. आराेपीने  तपासात संपूर्ण सहकार्य केले असून दाेन वेळा एसीबीची काेठडी दिल्याची बाजू  आराेपीचे वकील विशाल भानुशाली यांनी मांडली. त्यानंतर तिन्ही आराेपींना न्यायालयीन काेठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

जामीन अर्जावर तत्काळ सुनावणी फेटाळलीसोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावताच पाटाेळे यांचे  वकील  भानुशाली आणि जयेश तिखे यांनी आराेपींच्या ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश  एस. एस. शिंदे यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर मंगळवारी सुनावणीची मागणी करण्यात आली. मात्र, जामीन अर्जावर ८ ऑक्टोबर  रोजी सुनावणीचे आदेश न्या.  शिंदे यांनी दिले.  त्यामुळे  तिन्ही आरोपींची आता दाेन दिवसांसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bribery Case: Thane Municipal Officer and Two Others Jailed

Web Summary : Thane's suspended deputy commissioner, Shankar Patole, and two others were remanded to judicial custody for 14 days in a bribery case. They are accused of accepting ₹35 lakh from a builder for removing encroachments. Their bail plea hearing is scheduled for October 8.
टॅग्स :thaneठाणे