शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या कोविड रुग्णालयात तीन मुन्नाभाई एमबीबीएस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 11:36 IST

या तिघांच्या विरोधात अहवाल तयार केला असून तो महापालिका आयुक्तांकडे पाठविला आहे. तूर्तास या डॉक्टरांना घरी बसविले आहे. 

  ठाणे: ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उत्तम उपचार केले जातात, असा दावा केला जात असला तरी, याच कोविड सेंटरमध्ये तीन बोगस डॉक्टर आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे महापालिकेने केलेल्या डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहे.गोरगरीब कोरोना रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेने ११०० खाटांचे हे रुग्णालय उभे केले आहे. सुरुवातीला येथे डॉक्टरच उपलब्ध होत नव्हते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते घेतल्यामुळे रुग्णांना त्याचा फायदाही झाला. परंतु, आता याच रुग्णालयात बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये दोन इंटर्नशिप पूर्ण न केलेले तर एक डॉक्टर हा विद्यार्थी अशा तीन बोगस डॉक्टरांना पालिकेच्या आरोग्य विभागाने पकडले आहे. या तिघांच्या विरोधात अहवाल तयार केला असून तो महापालिका आयुक्तांकडे पाठविला आहे. तूर्तास या डॉक्टरांना घरी बसविले आहे. 

प्रशासनाने डॉक्टरांच्या भरतीसाठी ठेकेदाराची नियुक्ती केली होती. त्याच्याच माध्यमातून ही भरतीप्रक्रिया झाल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु, महापालिकेनेही याकडे लक्ष देणे गरजेचे होते.

आयसीयूमध्ये करीत होते रुग्णांची देखभालआयसीयूमध्ये रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. ग्लोबल कोविड सेंटरमध्येही तसे तज्ज्ञ होते. त्यांच्या मदतीला इंटर्नशिप पूर्ण न केलेले हे दोन डॉक्टरदेखील रुग्णांची देखभाल करायचे. 

टॅग्स :thaneठाणेdoctorडॉक्टरThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका