शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल हॉस्पिटलमधील बेड लाचप्रकरणी आणखी तिघांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 00:07 IST

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणातील परवेझ शेख (४२, रा. बांद्रा, मुंबई) या डॉक्टरला ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत

ठळक मुद्देदोषी डॉक्टर न्यायायलीन कोठडीतनाझनीन यांच्यावरील आरोपात तथ्य नाही

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणातील परवेझ शेख (४२, रा. बांद्रा, मुंबई) या डॉक्टरला ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये आणखी तिघांची लवकरच चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार हा गुन्हा २३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ग्लोबल रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तसेच रुग्णांना आवश्यकतेनुसार आयसीयू आणि ऑक्सिजन बेडही उपलब्ध करून देण्यात येतात. तरीही येथे रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप वसईतील एका रुग्णाच्या नातेवाइकांनी केला होता. खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेतल्याने ठाण्यातील या ग्लोबल रुग्णालयात दाखल करून, देतो असे सांगून रुग्णाच्या नातेवाइकांकडे दीड लाख रुपयांची मागणी करून हे पैसे घेण्यात आले होते. मनसेने याप्रकरणी कारवाईची मागणी केल्यानंतर महापौर म्हस्के यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याच प्रकरणामध्ये मे. ओमसाई आरोग्य केअर प्रा. लि. या खासगी कंपनीत सल्लागार असलेला डॉ. परवेझ तसेच नाझनीन, अबिद खान, ताज शेख आणि अब्दुल खान अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.कथित आरोपी डॉ. परवेझ याला २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. याच कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर केल्यावर ठाणे न्यायालयाने त्याला ११ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.कथित आरोपींपैकी डॉ. नाझनीन या दिवसा आयसीयूच्या डयुटीवर होत्या. त्यावेळी ज्या रुग्णाला दाखल करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप होता. त्या रुग्णाकडून त्यांनी पैसेच घेतले नसल्याचे चौकशीत उघड झाले. त्यामुळे सध्या तरी डॉ. नानझीन यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे समोर आले आहे. तर यातील अन्य तिघांची नावे स्पष्ट होत असून त्यांना लवकरच ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी