शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील माजी सैनिकाच्या तीन लाखांच्या दागिन्यांचा लागला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 23:13 IST

एका रिक्षात प्रवासादरम्यान परशुराम पालांडे या माजी सैनिकाच्या पत्नीची साडे नऊ तोळयांच्या दागिन्यांची पर्स विसरली होती. कोणताही धागादोरा नसतांना पोलिसांनी ही पर्स अवघ्या काही तांसामध्ये शोधून काढली.

ठळक मुद्देवागळे इस्टेट पोलिसांनी केला तपासकोणताही धागादोरा नसतांना लावला शोधदाम्पत्याने व्यक्त केली कृतज्ञता

ठाणे : माजी सैनिकाच्या पत्नीचे सुमारे तीन लाखांचे साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच हजारांची रोकड असलेली पर्स वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये शोधून काढली. ती पर्स या दाम्पत्याला गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी परत केल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.वागळे इस्टेट, ज्ञानेश्वरनगर येथील रहिवासी परशुराम पालांडे (७५) हे पत्नी उज्ज्वला (७०) हिच्यासह १ आॅगस्ट २०१८ रोजी महाड येथून दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यात परतले. खोपट एसटी बसस्थानकातून ज्ञानेश्वरनगर येथील आपल्या घरी ते रिक्षाने आले. त्यावेळी दागिने आणि रोकड असलेली त्यांच्या पत्नीची पर्स मात्र ते रिक्षातच विसरल्याचे घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या रिक्षाची आणि पर्सची शोधाशोध केली. मात्र, त्यांना ती मिळाली नाही. अखेर, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्यांनी याप्रकरणी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे इस्टेट पोलिसांनी खोपट आणि परिसरातील सीसीटीव्हींची पडताळणी केली. तेव्हा फुटेजमध्ये रस्त्यावर एका ठिकाणी त्यांना ही रिक्षा आढळली. त्या रिक्षाला देवीचे चित्र असल्याचेही स्पष्ट झाले. त्यावरून त्यांनी ठाण्यातील अशा अनेक रिक्षांचा शोध घेऊन त्यातील या रिक्षाचा क्रमांक आणि मालकाचे नाव शोधले. वागळे इस्टेट मनीषानगर, साईश्रद्धा या चाळीतील हा मालक निघाला. त्याच्याकडील चौकशीत ही रिक्षा त्याने विकल्याची माहिती समोर आली. ज्याला रिक्षा विकली होती, त्या कोपरीतील झोपडपट्टीत पोलिसांनी ही रिक्षा शोधली. तेव्हा रिक्षामध्ये ती पर्स आहे, तशाच अवस्थेत मिळाली. तोपर्यंत २ आॅगस्ट रोजी पहाटेचे १ वाजले होते. अखेर, पहाटेच पालांडे दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावून पठाण आणि त्यांच्या पथकाने मंगळसूत्र, सोन्याचा हार, कर्णफुले, दोन अंगठ्या आणि अडीच हजार रुपये रोख हा लाखमोलाचा ऐवज त्यांना सुपूर्द केला. अवघ्या काही तासांनी आपला ऐवज जसाच्या तसा मिळाल्याने पालांडे यांनी पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे