शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एटीएम क्लोनिंग करून साडेतीन लाखांची फसवणूक,  १४ जणांच्या बँक खात्यातून काढले परस्पर पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 20:52 IST

कळवा येथील विजया बँकेच्या एटीएम मशीनचे क्लोनिंग करून सुनील चौरसिया यांच्यासह १४ ग्राहकांच्या वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांतून तीन लाख ५७ हजार ९०० रुपये लुबाडल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.

ठाणे : कळवा येथील विजया बँकेच्या एटीएम मशीनचे क्लोनिंग करून सुनील चौरसिया यांच्यासह १४ ग्राहकांच्या वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांतून तीन लाख ५७ हजार ९०० रुपये लुबाडल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोंडाला मास्क लावून आणि डोक्यात टोपी घालून आलेल्या एका भामट्याने विजया बँकेच्या खारेगाव शाखेत खाते असलेल्या चौरसिया यांच्यासह इतर विविध बँकांच्या १३ खातेधारकांच्या खात्यातून कळव्याच्या विजया बँकेच्या खारेगाव येथील एटीएम सेंटरमधून पैसे काढल्याचा प्रकार ७ ते ९ सप्टेंबर रोजी घडला. येथील एटीएम सेंटरच्या मशीनला क्लोनिंग मशीन लावून या ग्राहकांच्या कार्डांचे स्कॅनिंग करून नंतर त्याआधारे बनावट एटीएमकार्ड बनवून या कार्डचा पुन्हा २ ते ६ आॅक्टोबर २०१७ दरम्यान पुणे, ठाणे आणि मुंबई परिसरातील एटीएम सेंटरमध्ये वापर केला. अशा रीतीने या १४ ग्राहकांच्या खात्यातून तीन लाख ५७ हजार ९०० रुपयांची रोकड एटीएम केंद्रातून काढली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर विजया बँकेच्या खारेगाव शाखा तसेच १४ ग्राहकांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक प्रदीपकुमार नायक यांनी कळवा पोलीस ठाण्यात ७ आॅक्टोबर रोजी दाखल केली आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधानाचे कलम ४२० तसेच आयटी अ‍ॅक्ट, ६६ (क) आणि (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विलास कदम अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crimeगुन्हा