शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमध्ये जबरी चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरटयांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 22:51 IST

रेल्वेमध्ये मोबाईलची जबरी चोरी करणाºया समीर रफीक शेख उर्फ कालीमांग (रा. मुंब्रा) याच्यासह तिघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून २९ मोबाईलसह तीन लाख २९ हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे २९ मोबाईलसह तीन लाख २९ हजारांचा ऐवज हस्तगत ठाणे रेल्वे पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रेल्वेमध्ये मोबाईलची जबरी चोरी करणाºया समीर रफीक शेख उर्फ कालीमांग (रा. मुंब्रा) याच्यासह तिघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून २९ मोबाईलसह तीन लाख २९ हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात त्याने या मोबाईलची चोरी केल्याची कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एका जबरी चोरीच्या तपासात सीसीटीव्हीच्या आधारे केलेल्या चौकशीमध्ये ही जबरी चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शेख याने केल्याची बाब समोर आली. त्याच आधारे मुंबई लोहमार्गचे पोलीस आयुक्त कैसर खलीद, मध्य परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने तंत्रज्ञ पुष्कर झाटे यांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास केला. तेंव्हा यातील संशयित आरोपी हा औरंगाबाद येथे असल्याचे समोर आले. त्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने औरंगाबाद येथील नारेगाव, सिडको एमआयडीसी येथून समीर शेख याला २३ एप्रिल २०२१ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक लाख ८६ हजारांचे आठ मोबाईल हस्तगत केले आहेत. या जबरी चोरीची त्याने कबूलीही दिली आहे. त्याच्यापाठोपाठ त्याचा साथीदार उबेदुल्ला शेख (४५) याला २४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे २७ एप्रिल रोजी रशीद शेख यालाही अटक करण्यात आली..............................असे व्हायचे कामाचे वाटप-या तीन आरोपींमधील समीर हा रेल्वेमध्ये मोबाईलची जबरी चोरी करायचा. हे मोबाईल तो उबेदुल्ला याच्याकडे लॉक तोडण्यासाठी द्यायचा. त्यानंतर रशीद हा या मोबाईलचे आयएमआय क्रमांक बदल करीत होता. त्यानंतर या मोबाईलची हे तिघे अल्प किंमतीमध्ये विक्री करीत असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या हार्डडिस्क, वेगवेगळे सिमकार्ड आणि मेमरीकार्डही जप्त केले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी