शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

घराची भिंत कोसळून तिघे जखमी, भिवंडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 01:43 IST

जूरफाटा, शिवाजीनगर येथील गल्लीत इमारतीच्या स्वच्छतागृहाची मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तीन मजूर खोदकाम करत असताना घराखालील पाया खचल्याने या घराची भिंत कोसळली.

भिवंडी : अंजूरफाटा, शिवाजीनगर येथे एका बैठ्या घराची भिंत मंगळवारी सायंकाळी कोसळली. या दुर्घटनेत घराशेजारील गल्लीत ड्रेनेज लाइनसाठी खोदकाम करणाऱ्या तीन मजुरांसह एक युवक जखमी झाला. ढिगाºयाखाली अडकलेल्या दोन मजुरांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले. त्यांच्यावर इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अंजूरफाटा, शिवाजीनगर येथील गल्लीत इमारतीच्या स्वच्छतागृहाची मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तीन मजूर खोदकाम करत असताना घराखालील पाया खचल्याने या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत खोदकाम करणारे विशाल, अनुष व विष्णुदेवा चव्हाण हे तीन मजूर ढिगाºयाखाली अडकून पडले. त्यावेळी त्या ठिकाणाहून जाणारा युवक गणेश हा जखमी झाला. विष्णुदेवाने स्वत:ची सोडवणूक करून घेतल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल व आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी ढिगाºयाखाली अडकलेल्या दोन मजुरांची सुखरूप सुटका केली.कविता चंद्रमौळी एलगट्टी या महिलेचे हे घर असून ती आपल्या दोन लहान मुलींना घेऊन घराबाहेर बसली असल्याने त्या बचावल्या. मागील तीन दिवसांपासून खोदकाम सुरू असल्यामुळे भिंतीचा आवाज येत असल्याची तक्रार तिने इमारतीमधील व्यक्तींकडे केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली.दरम्यान, घटनास्थळी भिवंडी महापालिका उपायुक्त डॉ. दीपक सावंत, सहायक आयुक्त नूतन खाडे, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदेयांनी भेट देत मदतकार्याची माहिती घेतली. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी