शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांनी मध्यरेल्वे रुळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 21:48 IST

चाकरमान्यांची तोबा गर्दी : कोपर, मुंब्रा स्थानकात बाधितांचे ठाण 

डोंबिवली: मुसळधार पावसामुळे शुक्रवारपासून रखडत धावणारी मध्यरेल्वे सोमवारी दुपारपासून काहीशी रुळावर आली. सकाळच्या पहिल्या सत्रमध्ये कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा सुरु होती. त्यातही जलद मार्गावरची वाहतूक बराच वेळ बंद होती. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकांमधील धिम्या मार्गावरील फलाट क्रमांक 1,2 आणि 3 या ठिकाणी प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठांचे हाल झाले. सोमवारी सकाळी 8.3क् नंतर धिम्या मार्गावरची वाहतूक पंधरा मिनिटांसाठी दुतर्फा खोळंबली होती. बदलापूर, टिटवाळा आसनगाव येथून सकाळी 9 र्पयत लोकल वाहतूक सुरु नव्हती. त्यामुळे तेथील प्रवाशांचे सोमवारीही हाल झाले. कल्याण -डोंबिवली परिवहनने दोन बसफे:या सोडल्याने बदलापूर ते कल्याण मार्गावर शेकडो प्रवाशांची सोय झाल्याची माहिती बदलापूरचे रहिवासी संजय मेस्त्री यांनी दिली. सकाळी बदलापूर, अंबरनाथ रेल्वे मार्गदेखील सुस्थितीत असल्याचा हिरवा कंदिल रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडून मिळाल्यावर सकाळी 1क् वाजून 17 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने या मार्गावर पहिली लोकल धावली. त्यादरम्यान टिटवाळा, आसनगाव, कसारा आदी स्थानकांमधूनही टप्प्याटप्प्याने लोकल सेवा सुरु झाली. बदलापूर ते कर्जत हा मार्ग सोमवारी संध्याकाळीही बंदच होता. दिवा, मुंब्रा मार्गावर रेल्वे रुळानजीक पाणी भरल्याने तेथे वाहतुकीचा वेग मंदावला होता. सोमवारी दिवसभर तुरळक सरी पडल्या. त्यामुळे कुठेही पाणी तुंबले नाही. दुपारनंतर लोकल वाहतूक सुरळीत झाली होती. जलद मार्गावरील वाहतुकीलाही सुरुवात झाली होती. अडीच वाजल्यानंतर साधारणपणो पंधरा मिनिटे विलंबाने लोकल धावल्या. कोपर रेल्वे स्थानकानजीक पूर्वेकडील चाळींमध्ये खाडीचे पाणी गेल्याने काहींनी रविवारची रात्र कोपर स्थानकात, तसेच पादचारी पुलावरच काढली. सोमवारीही काही बाधित फलाटातच पथारी मांडून बसले होते. मुंब्रा स्थानकात पश्चिमेला असलेल्या घरांमध्येही खाडीचे पाणी गेल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर आले. त्यामुळे त्यापैकी काहींनी सध्या काम सुरु असलेल्या फलाटांमध्येच संसार मांडला होता. बाधितांच्या घरचे बहुतांश सामान फलाटात ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, ठाणो रेल्वेस्थानकातदेखील प्रवाशांनी लोकल रोखून धरत संताप व्यक्त केला. फलाट क्रमांक 3 वर लोकल येताच प्रवाशांनी ती तात्काळ मुंबईला सोडण्याचा आग्रह केला. पण रेल्वे प्रशासनाने काही न ऐकल्याने प्रवासी नाराज झाले. त्यांनी तातडीने स्थानक प्रबंधकांचे कार्यालय गाठून त्रगा केला. त्यानुसार रेल्वे अधिका:यांनी प्रवाशांच्या मागणीखातर विशेष लोकल सोडण्यासंदर्भात वरिष्ठांशी संपर्क केला आणि अखेरीस गाडी सोडण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेlocalलोकल