शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘गडकरी’च्या अहवालाला तीन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:49 IST

ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षा गॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर आता हे नाट्यगृह वापरास योग्य आहे अथवा नाही

ठाणे : ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षा गॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर आता हे नाट्यगृह वापरास योग्य आहे अथवा नाही, छत पूर्णपणे काढून दुसरे बसवण्याची गरज आहे का, आदींसह इतर बाबींचा अभ्यास तांत्रिक अहवालाच्या माध्यमातून केला जात आहे. तो येण्यास आणखी तीन दिवस जाणार असल्याने तीन दिवस तरी गडकरीचा पडदा उघडला जाणार नाही. त्यामुळे या काळात होणारे प्रयोग रद्द केले आहेत.या इमारतीचे आयुर्मान तपासण्यासाठी स्ट्रक्चरल आॅडिटचे कामही सुरू झाले होते. परंतु, त्या आधीच ही घटना घडली. त्यामुळे आता ते कामही अर्धवट राहिले आहे. आता येत्या दोन ते तीन दिवसांत त्याचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती नगर अभियंता अनिल पाटील यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी येथे दोन प्रयोग होते, तर शुक्रवारीदेखील एकांकिका स्पर्धा आणि एक नाट्यप्रयोग होता. आता तोदेखील रद्द करण्यात आला आहे.संपूर्ण रंगायतनवरच छत टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यावर साडेतीन कोटींचा खर्च केला जाणार आहे.पुन्हा १४ मार्च १९९९ रोजी त्याचे नूतनीकरण करण्यात येऊन त्याचे उद्घाटनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्याची आसनक्षमता ९६२ एवढी आहे. रोज येथे नाटक अथवा इतर साधारणपणे चार प्रयोग होत असतात. १९७८ पासून हे नाट्यगृह ठाण्याची शान राखून आहे. परंतु, आता ते अधिक धोकादायक होऊ नये आणि पाण्याच्या माºयामुळे त्याचे आयुर्मान कमी होऊ नये, यासाठी संपूर्ण रंगायतनवरच छत टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, काही महिन्यांपूर्वी त्या आशयाचा प्रस्ताव मंजूर झाला असून सुमारे साडेतीन कोटींचा खर्च यासाठी केला जाणार आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून या इमारतीचे आयुर्मान तपासण्यासाठी स्ट्रक्चरल आॅडिटचे कामही सुरू झाले होते. परंतु, त्या आधीच ही घटना घडली. त्यामुळे आता ते कामही अर्धवट राहिले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्याचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती नगर अभियंता अनिल पाटील यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी येथे दोन प्रयोग होते, तर शुक्रवारीदेखील एकांकिका स्पर्धा आणि एक नाट्यप्रयोग होता. आता तोदेखील रद्द करण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका