शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

विनापरवानगी रस्ता दुरुस्तीवर तीन कोटी खर्च; दोषींवर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 00:21 IST

महापालिकेच्या या चुकीच्या कामामुळे यंदा पावसाच्या पाण्याचा फटका येथील कामगार हॉस्पीटलसह आजूबाजूच्या भागांना बसला आहे.

ठाणे : एकीकडे खाजगी रस्त्याच्या दुरुस्तीच्या मुद्यावरून पालिकेचा संबधीत विभाग अडचणीत आला असतांना आता आणखी एका रस्त्याच्या कामात पालिकेकडून दिशाभूल केली असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे मूळ निविदेत रस्ता उंच करण्याबरोबरच गटार नव्याने उभारण्याचे प्रस्तावित नसतांनाही केवळ त्याकामासाठी तब्बल तीन कोटींचा वाढीव खर्च केल्याचे समोर आले आहे.

महापालिकेच्या या चुकीच्या कामामुळे यंदा पावसाच्या पाण्याचा फटका येथील कामगार हॉस्पीटलसह आजूबाजूच्या भागांना बसला आहे.या संदर्भात भाजपचे रायलादेवी विभागाचे सरचिटणीस प्रशांत लंके यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा पालिकेला पत्राद्वारे दिला आहे. रायलादेवी व लोकमान्यनगर प्रभाग समिती अंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, रस्ता क्रमांक ३३ हा मूळ डांबरी रस्ता ६ इंच ते तीन फुट उंच केला आहे. तो उंच करण्याचे अथवा रस्त्यालगत असलेले गटार नवीन करण्याचे मूळ प्रस्तावात नमूद केले नव्हते. परंतु, हा रस्ता उंच केल्याने येथील औद्योगिक गाळ्यात पावसाचे पाणी शिरले होते. तसेच आंबेवाडी भागासह राजीव गांधीनगर झोपडपट्टीतही पाणी शिरले होते.२६ कोटींचा खर्च नेला २९ कोटींवरमाहिती अधिकाराअंतर्गत या रस्त्याची माहिती मागितली असता मूळ अंदाज खर्च हा २६ कोटींच्या आसपास होता. मात्र, नसलेल्या कामाचा यात समावेश करुन तो खर्च २९ कोटींच्या घरात नेल्याचा आरोपही यावेळी लंके यांनी केला आहे. परंतु, यासाठी कोणत्याही प्रकारची मंजुरी घेतली नसून सल्लागाराचीही मदत घेतली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर १५ दिवसात कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका