शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गुडविनकडून १६५ तक्रारदारांची तीन कोटी आठ लाखांची फसवणूक; नौपाडा पोलीसांत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 01:54 IST

मीरा रोड, वाशी, वसईतही होणार गुन्हे दाखल

जितेंद्र कालेकर ठाणे: नौपाडा पोलीस ठाण्यात गुडविन ज्वेलर्सच्या विरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवार आणि बुधवारी दिवसभरात ९२ गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत. आतापर्यंत १६५ तक्रारदारांची तीन कोटी आठ लाखांची फसवणूक झाली आहे. यातील एकाने तर पत्नीच्या नावाने पाच लाखांची आणि स्वत:च्या नावाने दहा लाखांची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘गुडविन ज्वेलर्स’ गुंतवणुकदारांच्या फसवणूकीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून नौपाडा पोलीस ठाण्यात २८ आॅक्टोबर रोजी पूजा शेलार आणि त्यांच्या आई निलीमा यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ ६८ तक्रारी दाखल झाल्या. ७० तक्रारदारांची एक कोटी ५३ लाख ६७ हजारांची फसवणूक झाली. त्यानंतर २९ आणि ३० आॅक्टोबर या दोनच दिवसांमध्ये तक्रारदारांची संख्या १६५ झाली असून त्यांची तीन कोटी आठ लाखांची फसवणूक झाली आहे. यामध्ये अब्राहिम यांची एकट्याचीच १५ लाखांची फसवणूक झालेली आहे. त्यांनी स्वत:च्या नावाने दहा लाखांची तर पत्नीच्या नावाने पाच लाखांची गुंतवणूक केली होती. याशिवाय, मंगेश मोकल यांची १३ लाख ५२ हजार, सुशांत थॉमस यांची १२ लाखांची, नरेंद्र आंबटकर यांची १२ लाख ६५ हजारांची फसवणूक आहे. हा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता आहे. गुडविनच्या मीरा रोड, वाशी, वसईतही शाखा होत्या. तिथेही अशाच प्रकारच्या तक्रारी असून त्याही संबंधित पोलीस ठाण्यात अथवा नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल होतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला असला तरी ठाण्यातील गुडविनबाबतची प्रत्येक तक्रारदाराची फिर्याद नौपाडा पोलीस ठाण्यात घेतली जाणार आहे. त्यासाठी एक विशेष अर्जाचा नमुनाही तयार करण्यात आला आहे. हीच फिर्याद आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केली जात आहे. - अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे

टॅग्स :Policeपोलिसfraudधोकेबाजी