शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोकणी पाड्यातील आदिवासींचे शेतीसह घराचे १५१ दावे वन हक्क समितीव्दारे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:55 IST

 कोकणीपाड्यातील या आदिवासी शेतकऱ्यांकडून वनहक्कांसाठी शेतीचे १८७ वनहक्क दावे वर्तकनगर प्रभाग समित द्वारे उपविभागीय-स्तरीय वनहक्क समिती ठाणे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केले होते. यापैकी १२ शेतीचे दावे मंजूर करण्यात आले. तर घरासाठीचे १५७ दावे मंजुरीसाठी समितीकडे सादर केले असता १८ दावे हे पुराव्या अभावी नामंजूर केले

ठळक मुद्देशेतीचे १२ दावे तर घराचे १३९ वनहक्क आदी १५१ दावे यावेळी समितीने घेतलेल्या बैठकीव्दारे मंजूर१३९ घराच्या दाव्यांना समितीने यावेळी मंजुरी १२ शेतीचे दावे मंजूर करण्यात आलेआदिवासींच्या १२ वर्षांच्या लढ्याला यश प्राप्त

ठाणे : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी म्हणजे वन हक्कांची मान्यता अधिनियमानुसार येथील मौजे कोकणीपाड्यातील शेतकऱ्यांसह रहिवाश्यांचे वनहक्काचे दावे वर्तकनगर प्रभाग समितीव्दारे उपविभाग स्तरीय वनहक्क समितींने शनिवारी मंजूर केले. यामध्ये शेतीचे १२ दावे तर घराचे १३९ वनहक्क आदी १५१ दावे यावेळी समितीने घेतलेल्या बैठकीव्दारे मंजूर करण्यात आले. याशिवाय संबंधीत दावेदारांना तत्काळ  पत्रांचे वाटप देखील यावेळी झाले.       कोकणीपाड्यातील या आदिवासी शेतकऱ्यांकडून वनहक्कांसाठी शेतीचे १८७ वनहक्क दावे वर्तकनगर प्रभाग समित द्वारे उपविभागीय-स्तरीय वनहक्क समिती ठाणे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केले होते. यापैकी १२ शेतीचे दावे मंजूर करण्यात आले. तर घरासाठीचे १५७ दावे मंजुरीसाठी समितीकडे सादर केले असता १८ दावे हे पुराव्या अभावी नामंजूर केले आणि १३९ घराच्या दाव्यांना समितीने यावेळी मंजुरी दिली. यावेळी ज्या शेतकऱ्यांचे शेती संबंधी दावे व रहिवाश्यांचे घरासंबंधीचे दावे नामंजूर झालेले आहेत. या विरोधात संबंधीत दावेदाराना सुमारे ६० दिवसात अपील दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे.         येथील संजय गांधी राष्टÑीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या या जंगलातील कोकणी पाड्यातील वनहक्क समिती ही वनहक्कांसाठी २००६ पासून लढाई लढत आहेत. शनिवारी त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामुळे या आदिवासींच्या १२ वर्षांच्या लढ्याला यश प्राप्त झाल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे. या कोकणी पाड्याच्या वनहक्क समितीचे अध्यक्ष रामचंद्र गावंडे, सचिव मनिष मोवळे, सदस्य व प्रभाग समिती सदस्य जयराम राऊत , प्रभू बु. चौधरी , महादू गावित, परशुराम दळवी, अर्जुन चौधरी, सुंदरबाई महाले, अनुसया महाले, चांगुणा मोकाशी, सुरेखा पागी आदींनी वनहक्क समिती व प्रभाग स्तरीय समितीने केलेल्या सहकार्याचे समाधान गावकऱ्यांनी व्यक्त करून आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेforestजंगल