शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या किसननगरात चोऱ्या करणारे त्रिकूट जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 00:04 IST

किसननगर भागात चो-या करणा-या साई ऊर्फ दशरथ हराळे , प्रदीप दळवी ऊर्फ बाबू आणि सुरज यादव या तीन सराईत चोरट्यांना श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली.

ठळक मुद्देचोरीचे तीन गुन्हे उघडकीसश्रीनगर पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वागळे इस्टेट, किसननगर भागात चो-या करणा-या साई ऊर्फ दशरथ दिनकर हराळे (२५, रा. शिवाजीनगर, वागळे इस्टेट, ठाणे), प्रदीप बाळकृष्ण दळवी ऊर्फ बाबू (३०, रा. किसननगर, क्रमांक-३, ठाणे) आणि सुरज जिलेदार यादव (२०, रा. किसननगर, ठाणे) या तीन सराईत चोरट्यांना श्रीनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांनी चोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून किसननगर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. किसननगर क्रमांक-३, भटवाडी येथील रहिवासी सुनील चौगुले यांच्याकडे २२ आॅगस्ट २०२० रोजी दुपारी ३ ते २७ आॅगस्ट रोजी सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा एक लाख ११ हजारांचा ऐवज चोरी झाला होता. या तक्रारीचाही पोलीस तपास करीत होते. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी श्रीनगर आणि किसननगर भागात गस्तीचे प्रमाण वाढविले. खबºयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काही सराईतांची त्यांना माहिती मिळाली. साई, प्रदीप आणि सुरज हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे त्यांची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर कोपरे यांच्या पथकाने केली. कोपरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह या तिघांनाही ५ सप्टेंबर २०२० रोजी अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी या घरफोडीसह एका टपरीतील चोरी तसेच मोटारसायकलीच्या चोरीचीही कबुली दिली. ठाणे न्यायालयाने त्यांना २० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपींकडून एक मोटारसायकल, काही रोकड आणि एक सोनसाखळी असा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.यातील प्रदीप दळवी या आरोपीने २०१९ मध्ये पडवळनगर येथील पंचपरमेश्वर मंदिरातील पाच दानपेट्या फोडून रोकड चोरली होती. यात त्याला ठाणे न्यायालयाने एक वर्षाच्या कैदेची शिक्षाही सुनावली होती. ती भोगून आल्यानंतर तो पुन्हा चोरीच्या गुन्ह्यात पकडला गेला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी