शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील बाजारपेठेत चोरी करणारे तीन सराईत चोरटे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 22:07 IST

ठाण्याच्या बाजारपेठेतील दोन दुकानांमधील एक लाख ४९ हजारांची रोकड लंपास करणाऱ्या ओमकार रोशन पानकार (१९, रा. कोलशेत, ठाणे) याच्यासह तिघांनाही ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या तिघांनाही २९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्दे ८६ हजारांची रोकड हस्तगतठाणेनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याच्या बाजारपेठेतील दोन दुकानांमधील एक लाख ४९ हजारांची रोकड लंपास करणाऱ्या ओमकार रोशन पानकार (१९, रा. कोलशेत, ठाणे) याच्यासह तिघांनाही ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून ८५ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.बाजारपेठेतील टाऊन ट्रेडर्स आणि मित ट्रेडर्स या दोन दुकानांमध्ये २३ मे २०२१ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शटर उचकटून ओमकारसह त्याच्या दोन साथीदारांनी रोकड लुटली होती. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी आणि पोलीस निरीक्षक आबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते, पोलीस हवालदार गणेश पोळ, पोलीस नाईक सुनिल गांगुर्डे आणि विक्रम शिंदे आदींच्या पथकाने केवळ तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आधी २५ मे रोजी ओमकार याला अटक केली. त्यापाठोपाठ नासीर खान (२०, रा. कोलशेत, ठाणे) आणि चैतन्य काल्लूर (२१, रा. तुर्भे, नवी मुंबई) या दोघांना अटक केली. चोरीच्या वेळी दोघेजण दुकानात तर एकजण एका रिक्षाजवळ उभा असलेले सीसीटीव्ही चित्रण या पथकाच्या हाती लागले. त्यानंतर या तिघांचीही धरपकड करण्यात आली. त्यांच्याकडून ८६ हजार ९०८ रुपयांची रोकड आणि रिक्षा असा तीन लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांनाही २९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी