शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठाण्यातील किंगकाँगनगरमधील तीन बांगलादेशींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 22:37 IST

बेकायदेशीरपणे भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या परवेश शेख (१९) याच्यासह तीन बांग्लादेशी नागरिकांना शुक्रवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली. बांगलादेशी नागरिकांची महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने शोधमोहीम घेऊन ठाण्यातील किंगकाँगनगरमध्ये गुरुवारी धडक दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

ठळक मुद्देमनसेने दिले होते पोलिसांच्या ताब्यातचार दिवसांची पोलीस कोठडीबेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणा-या बांगलादेशी नागरिकांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शोधमोहीम घेऊन ठाण्यातील किंगकाँगनगरमध्ये गुरुवारी धडक दिल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी यातील परवेश शेख (१९) याच्यासह तीन जणांना शुक्रवारी अटक केली. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून त्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.किंगकाँगनगरमध्ये बांगलादेशी वास्तव्य करीत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव आणि ठाणे शहरप्रमुख रवींद्र मोरे यांनी कासारवडवली पोलिसांना दिली. त्यांनीच या भागातील काही संशयितांची १३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चौकशी करून काही संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते आणि पी.एन. उगले तसेच त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन या प्रकाराची खात्री केली. त्याठिकाणी लालबानू कबीर मोला (३०, मूळ रा. तासपूर, जिल्हा जोशूर, बांगलादेश), परवीन नूर इस्लाम शेख (४०, मूळ रा. सुरेशर, ढाका, बांगलादेश) आणि परवेश नूर इस्लाम शेख (१९, मूळ रा. सुरेशर, ढाका, बांगलादेश) हे तीन बांगलादेशी बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असल्याचे आढळले. त्यांच्याविरु द्ध भारतीय पारपत्र अधिनियम १९२० चे अधिनियम कलम तीन अ आणि ६ -अ तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे त्यांच्याकडून भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्डही जप्त केले आहे.* प्रेमविवाह करून भारतात आणलेया तीनपैकी एका महिलेला तिच्या पतीने प्रेमविवाह करून बांगलादेशातून भारतात आणले. तिला तो ठाण्यात ठेवून पुन्हा बांगलादेशात गेला आहे. तर, दुसरीचा पती हा भारतीय असल्याचे उघड झाले आहे. या भागात आणखी बांगलादेशी आहेत का? तशी पडताळणी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीBangladeshबांगलादेश