शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ वन्य मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 22:12 IST

काळया जादूसाठी तसेच औषधी गुणधर्मासाठी प्रचलित असलेल्या दुर्मिळ खवले मांजराच्या खवल्यांची लाखो रुपयांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच किलोची खवले जप्त करण्यात आली आहेत.

ठळक मुद्दे४० लाखांत होणार होता सौदा सुमारे अडीच किलोची खवले जप्तमुंब्रा पोलिसांची कारवाई

ठाणे : दुर्मिळ वन्यप्राणी असलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची ४० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या विक्रम तुकाराम जाधव (४०, रा. नेरुळ, नवी मुंबई) याच्यासह तिघा तस्करांना मुंब्रा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे अडीच किलो वजनाची ८० ते ९० खवलेही हस्तगत करण्यात आली आहे.मुंब्रा रेतीबंदर पारसिक सर्कल, अमित गार्डन हॉटेलजवळ काळ्या जादूसाठी, तसेच औषधी गुणधर्मासाठी प्रचलित असलेल्या खवल्या मांजराचे खवले विक्रीसाठी तिघेजण आणणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय गळवे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गळवे यांच्यासह पोलीस हवालदार सुदाम पिसे, पोलीस नाईक अमोल कदम, तुषार पाटील, पोलीस शिपाई उमेश राजपूत, भूषण खैरनार आणि सुनिल वाघमारे आदींच्या पथकाने २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सापळा लावून मुंब्रा रेती बंदर पारसिक सर्कलजवळ विक्रम जाधव याच्यासह बाळकृष्ण जोगळे (४९, रा. भिवंडी) आणि अनिल घाडगे (४५, रा. सातारा) या तिघा संशयितांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये एका हिरव्या रंगाच्या बॅगमध्ये ही मौल्यवान खवले हस्तगत करण्यात आली. ही खवले ते ४० लाखांमध्ये विक्री करणार होते, अशी कबुलीही त्यांनी दिली. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही १ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीmumbraमुंब्रा